लोकमान्य नगर शिवसेना मध्यवर्ती विभागतर्फे थर्मल चेकिंग तपासणी संपन्न

लोकमान्य नगर शिवसेना मध्यवर्ती विभागतर्फे थर्मल चेकिंग तापाची तपासणी संपन्न 


ठाणे प्रतिनिधी मिलिंद महाडीक


        कोरोना (कोविड 19)संपूर्ण राज्यभर थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व जनतेचे घबराटीचे वातावरण आहे.सरकारी यंञणा, आरोग्ययंञणा जीवतोड काम करत आहे. तरी सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव काय कमी होत नाही. यासाठी महाराष्ट्र जिल्ह्याचे नगरविकास मंत्री, पालकमंत्री ठाणे व गडचिरोळी जिल्हा,  एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली वागळे इस्टेट डॉक्टर्स अशोसीएशन व  दिलीप चंद्रकांत बारटक्के साहेब शिवसेना गटनेते व नगरसेवक, ठा.म.पा.व लोकमान्य नगर शिवसेना मध्यवर्ती विभागतर्फे यांच्या वतीने थर्मल स्कॅनिंग चेकिंग शिबीर (तापाची तपासणी) दिं. ०१ जून 2020 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 02:00 वाजेपर्यंत.स्थळ  शंकर मंदिर, यशोधन नगर,लोकमान्य नगर पाडा नं २ ठाणे (प) सदर शिबिरात तापाची तपासणी (थर्मल चेकिंग) व पुढील मार्गदर्शन सेवा मोफत करण्यात आली. यात जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग घेतला. शिबीरात आपल्या विभागाला, शहराला, जिल्ह्याला,महाराष्ट्र राज्य ला,संपूर्ण देशाला व जगाला कोरोनामुक्त करूया. यासाठी स्थानिक शिवसैनिक, पोलिस मिञ(कोविड योद्धा) यांचे सहकार्य लाभले.


      दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


                घरी राहा, सुरक्षित राहा 
                प्रशासनाला सहकार्य करा...