एमटीएफ तर्फे ८०५ कुटुंबांना मदत

एमटीएफ तर्फे ८०५ कुटुंबांना मदतमुंबई प्रतिनिधी अनंत सोलकर


     कोरोना महामारीच्या काळात निवारा हक्क सुरक्षा समितीच्या वतीने एमटीएफ मार्फत संघर्षनगर वासीयांच्या ८०५ गरजू कुटुंबाना प्रत्येकी १००० रुपयांची मदत मिळालीअसून ती मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. आता पर्यंत एमटीएफ तर्फे ८ लाखाची मदत करण्यात आली आहे. ही मदत पदमविभूषण शबाना आझमी, पी. के दास, जेष्ठ पत्रकार गुरबीर सिंग, समाजसेवक दीपक दाते, संजय डावरे आदींच्या प्रयत्नामुळे मदत त्या कुटुंबाना मिळाली. जनतेला या काळात मदत झाल्याने नागरीकांनी निवाराच्या कार्याचे आभार मानले आहे. यासाठी विशेष मेहनत रावण गायकवाड, वसंत खाडे, अनिता जाधव, माणिक शिंदे, दिलीप जाधव, सुभाष शिंदे, प्रकाश शिंदे, माणिक गाडेकर, डी एम, अनंत जोशी, सचिन शिंदे, अन्सारी ताई, निश्चित साहेब, अशोक कांबळे, इमरान शेख यांनी घेतली


              दिगंबर वाघ  


          कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏