पत्रकारांची आर्थिक मदत तर डॉक्टरांनी केले मोफत उपचार
.जीव वाचलेल्या त्या कुटुंबाला NUJM च्या पत्रकारांची आर्थिक मदत. मोफत उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सॅल्युट!..या कुटुंबाला काम देण्यासाठी अनेक जण इच्छुक!.
आळेफाटा प्रतिनिधी अनुराग पवार
लॉक डाऊन मुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतमजूर कुटुंबाने विहिरीत आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना सर्वाना कळाली आहेच मात्र आज सायंकाळी आम्ही सर्व पत्रकारांनी या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र या संघटनेच्या जुन्नर तालुक्यातील सभासदांनी आळेफाटा येथील युनिक हॉस्पिटल ला भेट देऊन या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत केली.यावेळी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रायचंद शिंदे,जुन्नर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे, कार्याध्यक्ष विलास कडलाक,उपाध्यक्ष प्रमोद पानसरे,सचिव जयवंत शिरतर,खजिनदार सुुधाकर सैद,माजी अध्यक्ष सचिन डेरे,केदार बारोळे,या सर्वांनी ही मदत या कुटुंबाला दिली आणि या चौघांवर मोफत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभारही मानले. NUJM महाराष्ट्र चे मार्गदर्शक शिवेंद्रकुमारजी व राज्य अध्यक्ष शीतल करदेकर,पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन चपळगावकर यांनी याबद्दल अभिनंदन केलें आहे.
खर तर समाजातील चांगल्या-वाईट बातम्या आम्ही रोजच देत असतो.मात्र ही बातमी जरा वेगळी होती,विचार करायला लावणारी होती आणि मन सुन्न करणारी होती.....कोरोनाच्या लॉक डाऊन नंतर अनलॉक होत असताना भविष्यात समाजातील गरीब वर्ग,रोजंदारी करणारे नागरिक किती मोठया आर्थिक संकटाला सामोरे जातील त्यातलं हे प्रतिनिधीक उदाहरण.....आत्महत्या सारखा टोकाचा विचार नागरिक का करू शकतात? काम न मिळाल्यानंतर असं काही करू शकतो का हे न पटता ही पटवून घ्यावं लागेल...आज News 18 लोकमत वेब पोर्टल,दैनिक सकाळ आणि ,आज 24 तास या वाहिनीवर ही बातमी आली आणि अनेकांना विचार करायला भाग पाडले असेल....समाजातील सगळ्यात गरीब लोकांना,हातावर पोट असणाऱ्यांना लॉक डाऊन मध्ये पहिल्या एक दोन महिन्यात अनेकांनी जेवणाची,किराण्याची मदत केली पण आता अनलॉक नंतर काम मिळत नाहीये हे पण सत्य आहे....
संगमनेर येथील विजय गुंजाळ हा शेतमजुर पत्नी रेश्मा गुंजाळ, दोन लहान मुली दिव्या(वय३) व तनुष्का(वय६) यांच्या सह चार दिवसांपुर्वी आळेफाटा येथे काम शोधण्यासाठी आले.परंतु कोरोना मुळे त्यांना कोणीही काम देत नव्हते.काम नसल्याने खाण्यासाठी जवळ पैसे नव्हते.कुटुंबाची उपासमार होत होती.गावात घर नाही की जवळचं कोणी मदत करायला नाही यामुळे नैराश्य येऊन विजय यांनी कुटुंबासह आत्महत्येचा निर्णय घेतला.विहिरीत पडलेल्या त्या चौंघाना दीपक शंकर सुर्यवंशी यां युवकाने उडी मारून बाहेर काढले आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तात्काळ आळेफाटाच्या युनिक हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेले..पोटात पाणी गेल्याने या सर्वांना खूप त्रास तर झाला होता मात्र तेथील डॉ.आकाश आवारी,डॉ.राहुल पावडे व डॉ.सतीश कजबे त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला...एकीकडे कोरोना काळात पैसे देऊनही काही डॉक्टर पेंशट ला आपल्या दवाखान्यात घेत नाहीत तर दुसरीकडे अश्याही परस्थितीत डॉक्टरांमधे असलेल्या या मोफत सेवेला आणि माणुसकीला सॅल्युट करावा वाटला....
आता या चौघांची तब्बेत ठीक आहे.एक दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज ही मिळेल.बातमी नंतर अनेकांनी या लोकांना काम देण्याचं आश्वासन ही दिल आहे.मात्र या चौघांना जीवदान देणारा दीपक आणि युनिक हॉस्पिटल चे सगळे डॉक्टर या सर्वांना कायमस्वरूपी आठवणीत राहतील...तुम्हा सर्वांना आम्हा पत्रकारांचा सॅल्युट आहे!एकदा नाही 100 वेळा...!
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा,अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏