ससून रुग्णालयातील अधिसेविकेमुळे नर्सचा मृत्यू

ससून रुग्णालयातील अधिसेविकेमुळे नर्सचा मृत्यू


अखेर राजश्री कोरके यांचे निलंबन कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई यांच्या पाठपुराव्याला यश  !!प्रतिनिधी पुणे : कोरोना (कोविड-१९) महामारीसारखा महाभयंकर आजाराचा प्रादुर्भाव असताना देखील बै.जी. शासकीय वैद्यकीय व ससून रुग्णालय येथील अधिसेविका राजश्री कोरके यांच्या त्रासाला कंटाळून अनिता राठोड (पवार) यांचा मृत्यू   २४ एप्रिल २०२० रोजी ५:२० वाजता झाला असून कोरोनाच्या कामाचा अतिताण व वरिष्ठ अधिसेविका कोरके यांच्या जाचामुळे झाला आहे.  कोरके यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर हुकूमशाही पद्धतीने कामाचे वाटप करून आणि आपल्या मनमानी प्रमाणे इतर नर्स यांना त्रास देत आहेत.


     अधिक माहिती अशी की अनिता राठोड यांच्या मृत्यूस सर्वस्वी अधिसेविका कोरके या  जबाबदार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांचे म्हणणे होते व परिचारिकांना अपमानास्पद वागणूक देत होत्या नियमबाह्य पद्धतीने काम करण्यासाठी या अतिशय तरबेज होत्या. अशाच प्रकारे डॉ. चंदनवाले अधिष्ठाता यांचे शासनाने बदली ससून येथून झाल्यानंतर त्यांची बदली थांबवण्यासाठी कर्मचाऱ्यांना भडकवून नियमबाह्य पद्धतीने आंदोलन केले. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५ तसेच भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम-१९९७ व महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० नुसार लाॅकडाऊन मध्ये सोशल डिस्टटसिंग न ठेवता एकत्र जमून आंदोलन केले.
      अनिता राठोड यांचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यासाठी त्यांचे पती सुधाकर पवार यांनी तक्रार दाखल करून देखील कोरके यांच्या हस्तक्षेपामुळे कोणतीही चौकशी होत नव्हती आणि पोलीसांनी FIR घेतला नसल्यामुळे ते हतबल झाले होते. मग त्यांनी कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई यांच्याकडे लेखी विनंती करून मला शासकीय कार्यालयातील अधिकारी कोणतीही मदत करीत नसून आपण मला शासकीय कार्यालयाकडून न्याय मिळवून देण्यासाठी  मला मदत करावी अशी विनंती दिगंबर वाघ सरचिटणीस यांच्याकडे केली होती. कोकण विभाग पत्रकार संघाने तात्काळ प्रधान सचिवांसह विशेष कार्य अधिकारी यांना पत्रव्यवहार केला त्यानंतर थातूरमातूर चौकशी समिती नेमण्यात आली व चौकशी झाल्याचे सांगण्यात आले परंतु आम्ही त्यांना तात्काळ निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती.पहिल्या चौकशी समितीमध्ये कोरके यांनी हस्तक्षेप करून आणि मुंबई येथील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपल्या बाजूने चौकशी अहवाल तयार करण्यास सांगितले. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्यानंतर ही या चौकशी समितीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी तेथेच ठाण मांडून होत्या. त्यामुळे सरचिटणीस कोकण विभाग पत्रकार संघ यांनी २५ जून २०२० रोजीच्या पत्रामध्ये निलंबन न केल्यास उपोषण करण्याची तयारी केली होती. तेव्हा कुठे प्रशासनाने २६ जून २०२० रोजी कोरके यांचे निलंबन केले.
  आता विभागीय चौकशी करण्याची संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहेत. आता तरी नि:पक्षपणे चौकशी व्हावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना किड्या मुंग्यां प्रमाणे वागणूक देऊ नये तसेच कोरके यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा ही तात्काळ दाखल करण्यात यावा.  यांना कोण कोण वरिष्ठ अधिकारी सहकार्य करीत आहे. याची ही चौकशी होणे गरजेचे आहे. जेणेकरून परिचारिका यांच्यामधील भीतीचे वातावरण दूर होईल आणि कामावर आपली कोठेही गळचेपी होत नाही हे सिद्ध होईल.


  🎤    यापुढे कुणावरही अन्याय होणार नाही. याची काळजी घ्यावी तसेच अन्याय
 झाल्यास कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई यांच्याशी संपर्क करावा. आम्ही "न्याय व हक्क" मिळवून देण्यासाठीच कोकण विभाग पत्रकार संघाची स्थापना केली आहेत. आमच्या संघाचे सरचिटणीस दिगंबर वाघ कोणत्याही प्रकरणात अतिशय संयमाने आणि कायद्यानुसार पत्रव्यवहार करतात. आजपर्यंत यांनी अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहेत.  -- संजय हंडोरे पाटील संस्थापक अध्यक्ष कोकण विभाग पत्रकार संघ .


 🎤   माझी पत्नी अनिता  राठोड यांच्या सोबत जे घडले ते पैशाने मला वापस तर मिळणार  नाहीच परंतु यापुढे इतर कर्मचाऱ्यांसोबत असे घडता कामा नये. यासाठी कोरके यांना शिक्षा होणे गरजेचे आहे. पत्नी तर वापस येणार नाहीत.कोविड-१९ मध्ये ५० लाखाचा विमा व वारसाला नोकरी प्रशासनाने तात्काळ द्यावी. ऐवडीच अपेक्षा आहेत. -- सुधाकर पवार  मृत्यू परिचारिका अनिता राठोड चे पती


🎤  पहिल्या चौकशी समितीमध्ये डॉ. व्ही. एस. दुबे  डॉ. संजिवनी आंबेकर व डॉ. रविंद्रनाथ चव्हाण आणि दुसरी चौकशी समिती डॉ. रमेश भोसले व डॉ. शशिकला सांगळे यांच्या प्रथमदर्शनी अहवालात कोरके दोषी व जबाबदार दिसून येतात. --- चौकशी अधिकारी ससून रुग्णालय  पुणे


 


      दिगंबर वाघ  


       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏