कल्याण डोंबिवली मनपा मध्ये लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल

कल्याण डोंबिवली मनपा मध्ये लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल



मिशनबिगिनअगेन(पुनच्श्र: प्रारंभ) आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी सुधारीत आदेशानुसार नागरिकांना सुचना केल्या आहेत


कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण 


       सद्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची (COVID-19) लागण राज्यातील काही भागात पर्यायाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे. सदर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. त्या दृष्टीने राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दि.१३ मार्च, २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.


       वरील अधिनियम व नियमानुसार साथरोग अधिनियमाच्या खंड २(१) नुसार महापालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी घोषित करून त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात (COVID-19) वर नियत्रंण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे ते करण्यासाठी सक्षम असतील असे घोषित करण्यात आले आहे. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे संदर्भ क्र.१ अन्वये लॉकडाऊन शिथील करण्याच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने संदर्भ कं.२ नुसार दि.२/६/२०२० अन्वये आदेश पारीत केले आहेत. परंतु शासनाने संदर्भ कं.३ मधील आदेशान्वये खालील प्रमाणे सुधारणा केल्या असल्याने, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संदर्भ क्र.२ च्या आदेशात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.आहेत.


परंतु शासनाने संदर्भ कं.३ मधील आदेशान्वये खालील प्रमाणे सुधारणा केल्या असल्याने, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संदर्भ क्र.२ च्या आदेशात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.


अ) Mission Begin Again Phase I(With effect from दि.०३ जून, २०२० पासून दि.३० जून, २०२०पर्यंत ) मध्ये


१) सार्वजनिक व खाजगी मैदाने, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सोसायटीचे ग्राऊंड या ठिकाणी व्यायाम, जॉगींग, रनिंग, चालणे, सायकल चालविणे इ. करिता खालील अट मुळ आदेशाच्या "g" नंतर समाविष्ट करण्यात येत आहे. h) उद्यान, मैदान तसेच खुल्या जागेतील व्यायामाची साधने (ओपन जिम) तसेच लहान मुलांची खेळण्याची साधने उदा. घसरगुंडी, झोपाळे इ. यांचे वापरास प्रतिबंध करण्यात येत आहे.


ब) Mission Begin Again Phase II (With effect from दि.०५ जून, २०२० पासून दि.३० जून, २०२० पर्यंत ) यामधील १ "d" नंतर खालील अटीचा समावेश करण्यात येत आहे. e) रस्त्याच्या/गल्ली/पॅसेजच्या एका बाजुची सर्व दुकाने एका दिवसासाठी पुर्ण कामकाजाच्या वेळेत सुरू राहतील व रस्त्याच्या दुसऱ्या बाजुची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू राहतील व यापुढे आळीपाळीने ही दुकाने सुरू राहतील.


क) Mission Begin Again Phase III (With effect from दि.०८ जून, २०२० पासून दि.३० जून, २०२० पर्यंत ) मध्ये


१) सर्व खाजगी कार्यालये आवश्यकतेनुसार १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असुन, उर्वरीत कर्मचाऱ्यांनी घरुन काम करणे अपेक्षीत राहील. तथापी सर्व मालकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यासांठी कोविड-१९ रोगाचा संसर्ग होवु नये यासाठी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत प्रशिक्षण देणे व त्याप्रमाणे खबरदारी घेण्याचे निर्देश द्यावेत. त्याचप्रमाणे घरी परतल्यावर घ्यावयाच्या काळजी बाबत प्रबोधन करावे. जेणे करुन घरातील वरिष्ठ व्यक्तींना संसर्गाची लागण होणार नाही असे नमुद आहे त्याऐवजी खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. 


        सर्व खाजगी कार्यालये आवश्यकतेनुसार १० टक्के किंवा १० या कमाल संख्येच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असुन, उर्वरीत कर्मचाऱ्यांनी घरुन काम करणे अपेक्षीत राहील. तथापी, सर्व मालकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यासांठी कोविड-१९ रोगाचा संसर्ग होवु नये यासाठी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत प्रशिक्षण देणे व त्याप्रमाणे खबरदारी घेण्याचे निर्देश द्यावेत. त्याचप्रमाणे घरी परतल्यावर घ्यावयाच्या काळजी बाबत प्रबोधन करावे. जेणे करुन घरातील वरिष्ठ व्यक्तींना संसर्गाची लागण होणार नाही


      शासनाकडील संदर्भ क.३ मधील ९ (ii) अन्वये आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य प्रवास करण्यास यापूर्वी प्रमाणेच नियमन केले जाईल. मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात मोडणाऱ्या जिल्हयांमध्ये आंतरजिल्हा प्रवास करण्यास नागरिकांवर बंधन असणार नाही.


उर्वरीत बाबी तसेच अटी व शर्ती संदर्भ कं.६ वरिल दि.२/६/२०२० च्या आदेशा प्रमाणे कायम राहतील. 


         सदर आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती/ संस्था ही महाराष्ट्र साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७, महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम, २०२० चे नियम II नूसार व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय व इतर कायदेशिर कारवाईस पात्र राहील.


    दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


                 घरी राहा, सुरक्षित राहा 
                 प्रशासनाला सहकार्य करा...