मुद्रांक शुल्क दर कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल

मुद्रांक शुल्क दर कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल


            -- महसूल मंत्री बाळासाहेब थोरातमुंबई प्रतिनिधी : येत्या 31 डिसेंबर 2020 अखेरपर्यंत 3 टक्के तर 31 मार्च 2021 पर्यंत  2 टक्के मुद्रांक शुल्क दर सवलतीमुळे सर्वसामान्य, शेतकरी  वर्ग यांच्यासह बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळेल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. थोरात म्हणाले की, सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर दि.1 सप्टेंबर, 2020 पासून ते दि.31 डिसेंबर, 2020 या कालावधीकरिता 3 टक्केने तर दि.1 जानेवारी, 2021 ते दि.31 मार्च, 2021 या कालावधीकरिता 2 टक्केने  कमी करण्यात आला आहे.
       कोविड-१९ मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिक आणि विविध संघटना यांच्याकडून मुद्रांक शुल्क कमी करण्याची मागणी महसूल विभागाकडे करण्यात येत होती. राज्य शासनाने या बाबत पुढाकार घेऊन घर खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे थोरात यांनी सांगितले.


      दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏