शिक्षकांचे ई-मेल पाठवा आंदोलन सुरू

शिक्षक भारतीचे   १२ऑगस्ट २० पासून राज्यस्तरीय मेल भेंजो आंदोलन. 
🎤  आंदोलनातील मागण्या


⚫ विशेष शाळेतील कर्मचाऱ्यांना ७ वेतन आयोग त्वरीत लागू करा..
⚫ मार्च-एप्रिल पासून रखडलेले वेतन तात्काळ दया.
⚫  वेतन प्रलंबित होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना  निलंबित करा.


मुंबई प्रतिनिधी अनंत सोलकर : राज्यातील सर्व विषेश शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनी हो सामाजिक न्याय मंत्रालय ते स्थानिक जिल्हा कार्यालयांच्या अनास्थेने वरील दोन प्रश्नांनी आपण प्रचंड ग्रासले गेलो आहोत.७ व्या वेतन आयोगाचा गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा करीत असताना प्रस्तावात आतापर्यंत तब्बल ८ ते ९ वेळा दुरुस्तीच्या नावे अक्षम्य दिरंगाई करण्यात आली आहे. अंतिम मसुदा अद्यापही सचिव स्तरावर धूळ खात पडून आहे.
     तसेच राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे माहे मार्च-एप्रिल पासून वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना प्रचंड आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष निर्माण झाला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यस्तरीय आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याचा पाहिला टप्पा म्हणून संबंधित मंत्री, सचिव व आयुक्त यांना हजारोंच्या संख्येने १२ ऑगस्ट १३ ऑगस्ट व १४ ऑगस्ट २०२०पासून शिक्षक भारती व राज्यातील तमाम सहयोगी संघटनांच्या वतीने "मेल भेंजो" आंदोलन पुकारण्यात येत आहे.तुमचा प्रत्येक मेल हा संबंधित यंत्रणांसाठी निर्वाणीचा ईशारा असणार आहे. यानंतरही शासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन रस्त्यावरील व्यापक राज्यस्तरीय आंदोलन असेल व त्यास शासनास  जबाबदार धरले जाईल. तरी आपण सर्व सहकाऱ्यांनी खालील मान्यवरांच्या मेलआयडीवर क्लिक करून सोबत पाठवलेले निवेदन केवळ कॉपीपेस्ट करुन पाठवायचे आहे. 
      आपल्या मेलची एक पोहोच आम्हांला शिक्षक भारतीच्या shikshakbhartimumbai@gmail.com या मेलवर नक्की दया.
1) धनंजय मुंडे, मंत्री, सा. न्याय. officeofdm@gmail.com 
2) पराग जैन ननौटिया प्रधान सचिव, सा. न्याय sec.socjustice@maharashtra.gov.in
3) प्रेरणा देशभ्रतार आयुक्त
commissioner_disability@yahoo.co.in
 
     १२ ऑगस्ट १३ ऑगस्ट  व १४ ऑगस्ट २०२० रोजी वरील मान्यवरांना सोबतचा ईमेलचा नमुना कॉपीपेस्ट करुन मेलद्वारे जरूर पाठवा व आपल्या न्याय्य हक्कासाठी ईशारा दया.
    लडेंगे !!   जितेंगे !!
विजय साबळे  मधुकर मोरे विलास पंडित जयदीप बनसोडे  संजय गोरड वाडिले  बालाजी जाणते सुनील पवळे  चंद्रशेखर मोरे  मठपती  एजाज शेख  राजेश नेवाळकर पल्लवी हळदणकर कृतिका सोमण  सोनाली बाने  विमा बच्छाव.


      दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏