दिव्यांगत्वाच्या प्रकारांबाबत माहिती व जनजागृती

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत अनुवंशिकता व दिव्यांगत्व या मधील सहसंबंध या विषयावर  मोफत वेबिनार



मुंबई प्रतिनिधी : दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 अंतर्गत 21 दिव्यांगत्वाच्या प्रकारांबाबत माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत विविध वेबीनार आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार दि. 16 ऑक्टोबर 2020 रोजी दु. 12.00 वाजता  अनुवंशिकता व दिव्यांगत्व यामधील सहसंबंध याबाबत अधिक माहिती  देण्याकरिता  डॉ. प्रकाश गंभीर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/79s19y66Ij0 या लिंकचा वापर करावा. तसेच यापुर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या वेबीनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या यु टयूब चॅनलला भेट द्यावी.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..