राज्यातील ९६ पोलीस अधिकाऱ्यांना बढती

पोलीस उप अधीक्षक सहाय्यक आयुक्त यांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बढती देण्यात आली 

- महासंचालक

मुंबई प्रतिनिधी:  राज्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पोलीस उप अधीक्षक व सहाय्यक आयुक्त (निःशस्त्र) या पदावर पदोन्नती देण्यासाठी टाळाटाळ होत होती.२०१७-१८,२०१८-१९ व २०१९-२०२० या संवर्गातील अनेक अधिकाऱ्यांना याचा फायदा झाला आहेत.

        या पदोन्नतीसाठी मा.सर्वोच्च न्यायालयात क्र.२८३०६/२०१७ नुसार एक याचिका दाखल करण्यात आलेली होती.सदर पदोन्नती ही निव्वळ तात्पुरती स्वरूपाची आसून अधिकाऱ्यांना नियमितपणे सेवाजेष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाहीत.सदर पदोन्नती ही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि न्यायालयाच्या आदेशानुसार देण्यात आली आहेत. पदोन्नती देण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ रुजू होण्यासाठी पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक मुंबई यांनी सांगितले आहेत तसेच निवडणूक आचारसंहिता याचा विचार करूनच कारवाई करावी असे सुद्धा म्हटले आहेत.

       या ९६ पोलीस अधिकारी यांच्या नावाची यादी ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याचा संकेतांक २०२०१२२४१७०९३२४५२९ असा आहेत.दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏