मुंबई प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व पोलीस मुख्यालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने कोकण विभागा अंतर्गत शालेय कुस्ती स्पर्धा २०२४-२०२५ आयोजित करण्यात आली होते.या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उप-आयुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते झाले होते.
यावेळी मुलींच्या स्पर्धेत तिसगावची शान तिसाई मातेचा आशीर्वाद जय गावदेवी कुस्ती संकुल पिसवली तालीमचे अध्यक्ष श्रीपत भोईर आणि इंटरनॅशनल प्रशिक्षक रंगनाथ हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पैलवान नेहा अनंता गायकवाड हिने ७३ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला यावेळी नेहाला गोड-मेडल देऊन तिचा सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धेत मुलीची पहिली निवड झाल्याबद्दल तिचे कुटुंबासह गावातील नागरिकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावासह जल्लोष करण्यात आला.तिला पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८