सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेला प्राधान्य द्या

सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेला प्राधान्य द्या, उपायुक्तांना दिले सार्वजनिक शौचालय  आणि रस्ते स्वच्छता पाहणीचे निर्देश !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण  : नागरिकांचे विशेषत: चाळी झोपडपट्टी परिसर  या ठिकाणी वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पालिका आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व उपायुक्तांना सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची त्याचप्रमाणे रस्ते साफसफाईची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत, सदर निर्देशानुसार विभागीय उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली

 महापालिका प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागातील  सार्वजनिक शौचालयांची विभागीय उपायुक्त आणि प्रभागातील आरोग्य निरीक्षक,  मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्यासमवेत पाहणी केली, पाहणी करताना तिथे राहणाऱ्या  नागरिकांशी चर्चा करून त्यांचा प्रतिसाद जाणून घेतला.ही पाहणी करताना काही  काही ठिकाणी असलेली सार्वजनिक शौचालये नादुरुस्त अवस्थेत असलेली आढळून आली  तर काही शौचालये  चोकअप झालेली आढळून आली.  नादुरुस्त शौचालये त्वरित दुरुस्त करणे बाबत निर्देश शौचालयांची पाहणी करणाऱ्या विभागिय उपायुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, त्याच प्रमाणे चोकप असलेल्या शौचालयातील चोकप काढून सदर शौचालये नियमित स्वरूपात स्वच्छ ठेवणे बाबत निर्देशही त्या- त्या प्रभागातील आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना देण्यात आले आहेत .शौचालय साफ सफाई  बरोबरच पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागात रस्ते सफाईवरही भर दिला असून कचरा साठण्याच्या जागा (vulnerable garbage points) दररोज कटाक्षाने साफ  करणे बाबत भर दिला आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८