पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या टीमचं अभिनंदन केलं. यावेळी ते म्हणाले, की, आज चंद्रावर चांद्रयान-3 लॅंडिंग झालं आहे. ही घटना ऐतिहासिक, अभिमानास्पद आहे. हा क्षण ऐतिहासिक असून अभूतपूर्व आहे. तसेच भारताच्या विकासाठी एक महत्वाचा टप्पा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.पीएम मोदी म्हणाले आयुष्य धन्य झाले आहे. विजयाच्या मार्गावर चालण्याचा हा क्षण आहे. आज प्रत्येक घरात सेलिब्रेशन सुरू झाले आहे. मी चांद्रयान-3 च्या टीमचे आणि देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो.
शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे आपण दक्षिण ध्रुवावर पोहोचलो आहोत जिथे कोणीही पोहोचू शकले नाही. आज सर्व समज बदलतील. आपण पृथ्वी माता आणि चंद्राला मामा म्हणतो.भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने उंचावली आहे. जनतेचा उर आनंदाने भरुन आला आहे. आज प्रत्येकजण इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत प्रत्येकजण एवढच म्हणत आहे की गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा. कारण भारताच्या चांद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलं आहे. इस्त्रोचे यान चंद्राच्या कुशीत शिरलं आहे.