केडीएमसी मधील वाहनचालकांना सुरक्षा साहित्या पासून वंचित !
कोरोना सारख्या महामारी आजारात आजपर्यंत वाहनचालकांना साहित्य न पुरवल्यामुळे आरोग्य धोक्यात ?
कल्याण प्रतिनिधी : विनायक चव्हाण
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांमध्ये कचरा उचलणे व त्याची विल्हेवाट लावणी यासाठी वाहनावर कंत्राटी पद्धतीने (ठोकपगारी) विशाल एक्सपोर्ट कं. आर & बी कं. यांच्याकडून हे कामे करून घेतली जातात. कंत्राटी (ठोकपगारी) वाहनचालकांना मनपा प्रशासन कोणतेही सुरक्षा उपकरणे (साहित्य) देत नसल्याबाबत आयुक्त विजय सूर्यवंशी यांना या वाहनचालकांनी २९ मे २०२० रोजी निवेदन दिले यामध्ये त्यांचे म्हणणे आहे की कोरोना ( कोविड-१९) सुरू झाल्यापासून फक्त जोशी सहा. आरोग्य निरीक्षक यांनी ५० मि.ली. ची एक बॉटल दिली त्यानंतर आजपर्यंत कोणतेही उपकरणे सुरक्षा किट देण्यात आलेले नाहीत. मागणी केली असता सहा. आरोग्य निरीक्षक अगुस्तीन घुटे सांगतात की मी तुम्हाला एका मिनिटात कामावरून कमी करेल अशा प्रकारच्या धमक्या ते देत आहेत घनकचरा व्यवस्थापनचे उपयुक्त रामदास कोकरे फक्त तुम्हाला साहित्य मिळाले ? एवढेच विचारण्यात समाधान मानत आहेत. परंतु तात्काळ साहित्य देण्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांना रस नाही.
विशेष म्हणजे या मनपाचे आयुक्त हे स्वतः डॉक्टर आहेत परंतु हेच आपल्या केबिनच्या बाहेर पडण्यास तयार नाहीत असे अनेक नागरिक आणि नगरसेवक आपला रोश फेसबूक व्हाट्सअप यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करीत आहेत नागरिकांना आता हे खरंच डॉक्टर आहे ? असा प्रश्न पडला आहेत. नागरिकांचे म्हणणे आहेत की अशा परिस्थितीत नागरिकांना व आपल्या कर्मचाऱ्यांना आयुक्त यांनी पालकांप्रमाणे संभाळणे गरजेचे आहेत. जर कर्मचाऱ्यांना हे साहित्य दिले जात नसेल तर मग नागरिकांनी अपेक्षाच न केलेली बरी ?
कंत्राटी (ठोकपगारी) वाहनचालक कसे आलेत ?
तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी अनेक वर्तमान पत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करून आणि नियमानुसार या वाहनचालकांना 20 डिसेंबर 2012 रोजी च्या आदेशानुसार सेवेत घेतले त्यानंतर प्रत्येक सहा-सहा महिन्याला त्यांना आदेश दिला जात होता. त्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या आर्थिक स्वार्थासाठी यांना कामावरून कमी करण्याचा डाव यांनी मांडला होता. आता हे अधिकारी काही सेवानिवृत्त झाले तर काही लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. यांच्या त्रासामुळे वाहनचालक हे ३१ मार्च २०१५ मध्ये कामगार न्यायालयात गेले त्यानंतर वारंवार मनपा प्रशासन यांना त्रास देत असत. चार-चार महिन्याचे पगार नसतानाही ही यांनी आपले काम हिमाम हेतबारे चालू ठेवले आहेत आता कामगार न्यायालयाने २७ सप्टेंबर २०१९ रोजी यांना पुढील दोन महिन्याच्या आत कायम करा असा आदेश दिला आहेत तरी यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि वाहनचालकांना चार महिने पगार दिला नाही मनपा प्रशासन हे न्यायालय पेक्षा स्वतःला मोठे समजत आहेत ? काही अधिकारी आर्थिक स्वार्थासाठी हे करित असल्याचे बोलले जात आहेत.
त्यामुळे आपल्याला राजकारण करण्यासाठी पुढे खूप मोठा कालावधी आहेत आता ही परिस्थिती राजकारण करण्याची नसून कोरोना सारख्या महाभयानक आजारावर मात करण्याची असून सर्वांनी काळजी घेऊन काम करणे गरजेचे आहेत त्यामुळे आयुक्त यांनी स्वतः लक्ष केंद्रित करून सर्व साहित्याचे वाटप नियोजन करून द्यावे अशी अपेक्षा कर्मचारी अधिकारी करत आहेत.
१) खबाळपाडा वाहनतळावर कोणतीही सुविधा मिळत नाही संडास बाथरूम सॅनिटजर पिण्याचे पाणी आणि अधिकारी सांगतात दोन वाजेपर्यंत वाहन वाहनतळावर आणू नये.
२) जर आम्हाला कोरोना(कोविड-१९) या अजाराची लागण झाली आणि यामध्ये कुणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी आम्ही आमचे स्वतःचे मृत्युपत्र कुटुंबाजवळ लिहून ठेवले आहेत. त्यामध्ये कुटुंबीयांनी संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवल्या शिवाय प्रेत ताब्यात घेऊ नये. - ठोकपगारी वाहनचालक
ठोकपगारी वाहनचालकांच्या तक्रारवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
ॲनतूनिच्या संपूर्ण वाहनचालक व कामगार यांना आम्ही साहित्य दिले आहेत आपण मला संबंधित प्रमुख आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकाचे नाव कळवा मी त्यांना नोटीस देईल - उपयुक्त घकव्य केडीएमसी रामदास कोकरे
वाहनचालकांना सुरक्षा उपकरणे साहित्य देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाहीत मात्र नरेंद्र धोत्रे यांची फ वार्ड येथे बदली आदेशावर १६ मे २०२० सुट्टीच्या दिवशी सही करून घुटे कोकरे आणि सुनिल पवार यांनी लाखो रुपये कमावले ? विशेष म्हणजे सुनिल पवार हे अतिरिक्त आयुक्तपदावर हजर होऊन चार दिवस झाले होते राज्य शासन यांना पैसे कमवण्यासाठी मनपामध्ये पाठवते ? लॉकडाऊन संपल्यानंतर याविरुद्ध आपण न्यायालयात जाणार आहेत. - संजय हंडोरे पाटील. संस्थापक अध्यक्ष कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई, महाराष्ट्र राज्य