मानीव अभिहस्तांतरण म्हणजे काय जाणून घ्या

मानीव अभिहस्तांतरण (Deemed Conveyance)

ॲड. विशाल लांजेकर यांच्या लेखणीतून सोप्या भाषेत प्रश्न उत्तरे  

दर आठवडयाला, दर सोमवारी...

भाग -३
सदर प्रक्रिया किचकट असल्याने त्याला गृहनिर्माण संस्थाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून थंडावलेल्या या मोहिमेला पुन्हा एकदा गती देण्याचा निर्णय आपल्या शासनाने घेतला आहे आणि सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्रराज्य, पुणेयांचे मार्फत दिनांक १ जानेवारी, २०२१ ते १५ जानेवारी, २०२१ या कालावधीमध्ये मानीव अभिहास्तांतरित विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे .


प्रश्न १२)  मानीव अभिहस्तांतरण म्हणजे काय ?

उत्तर  सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनीची मालकी व हक्क हस्तांतरित करणे.

प्रश्न १३)  मानीव अभिहस्तांतरण न केल्याने संस्थेचे होणारे नुकसान आणि केल्याने होणारे फायदे ?

उत्तर   मानीव अभिहस्तांतरण संस्थेने न केल्यास,पुनर्विकासामध्ये जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधताना त्या संस्थेला बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते.तसेच इमारतीचे मानीव अभिहस्तांतरण झालेले नसल्याने बांधकाम व्यावसायिकाला वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक याचा (एफएसआय-फ्लोर स्पेस इंडेक्स) फायदा घेता येतो. तसेच,इमारतीच्या मोकळ्या जागेत अन्य काही बांधकाम ही विकासकाला करता येते. विकासकाच्या या स्वार्थी वृत्तीमुळेच विकासक व संस्थाना स्वतःहून कन्वेअन्स करून देत नाहीत. यामुळे संस्थेने कायदेशीरबाबी पाहण्यासाठी वकिलाचा सल्ला घेतल्यास नक्कीच त्याचा फायदा संस्थेस होईल.  

मानीव अभिहस्तांतरण केल्यास, पुनर्विकासामध्ये वाढी इमारत चटई क्षेत्र निर्देशांक हा सदनिकाधारकांना मिळणार असल्याने त्याचा संस्थेस फायदाच असतो. तसेच, बांधकाम व्यावसायिकाचा त्या जागेवरील हक्क संपतो.

प्रश्न १४) गृहनिर्माण संस्था कोणत्या कायद्यान्वयेमानीव अभिहस्तांतरण करूशकते ?

उत्तर   महाराष्ट्र सदनिका मालकीहक्क अधिनियम, १९६३ मधील तरतुदीनुसार गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन झाल्यावर ४ महिन्यात विकासकाने इमारातीच्या जमिनीचे संस्थेच्या नावे हस्तांतरण करून देणे बंधनकारक आहे.तथापि, या तरतुदीची अंमलबजावणी विकासक/प्रवर्तक यांच्याकडून होत नसल्याने गृहनिर्माण विभागाने सदर अधिनियमाच्या कलम १० व ११ मध्ये दुरुस्ती करून सहकारी गृहनिर्माण संस्थांचे एकतर्फी मानीव अभिहस्तांतरण करण्याची तरतूद करण्यात आली.

प्रश्न १५) मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागतो ?

उत्तर  मानीव अभिहस्तांतरण करण्याकरिता ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज संबंधित सक्षम प्रधीकारी म्हणून जिह्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सादर करावा लागतो.

प्रश्न १६) गृहनिर्माण संस्थेलामानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्रनोंदणी करण्यासाठी किती मुदांक शुल्क भरावे लागते ?

उत्तर   निष्पादनाच्या दिनाकाच्या वेळी प्रचलित अनुच्छेद २५ मधील संबंधित दरानुसार, योग्य मुद्रांकावर, रीतसर नोंदणी केले असतील तर रु. १००/- (प्रत्येकी) किंवा शासन वेळोवेळी निश्चित करेल अशा एकूण मुद्रांक शुल्कावर निष्पादित करून संबधित दुय्यम निबंधकाकडे नोंदणीसाठी सदर करता येईल. 

प्रश्न १७) गृहनिर्माण संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास सदर संस्था मानीव अभिहस्तांतरणाचा अर्ज करू शकतात का ?

उत्तर  होय. संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे तसेच सदर इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदाऱ्या/दायित्व स्वीकारण्यास तयार असल्याचे तसेच मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अर्ज करणार असल्याबाबत स्व-प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

(लेखक : व्ही लॉ सोल्युशनस चे संस्थापक आहेत) 

advocatevlawsolutions@gmail.com




दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏