राज्यातील वैवाहिक व कौटुंबिक वादाची प्रकरणे निकाली

राज्यातील वैवाहिक व कौटुंबिक वादाची प्रकरणे निकाली


कौटुंबिक न्यायालयांना पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी मुंबई प्रतिनिधी : राज्यातील वैवाहिक व कौटुंबिक वादाची प्रकरणे निकाली काढण्याकरिता कौटुंबिक न्यायालयांची असलेली आवश्यकता विचारात घेता लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद व परभणी येथे स्थापन करण्यात आलेल्या कौटुंबिक न्यायालयांना ज्या दिनांकास ती सुरू झालीत तेथून पुढे ५ वर्षाच्या कालावाधीसाठी  मंजूरी  देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.


            या कौटुंबिक न्यायालयांकरिता  पुढील ५ वर्षांकरीता येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चाकरिता ३३ कोटी ६० लाख ६६ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच १४ व्या वित्त आयोगांतर्गत “तांत्रिक मनुष्यबळ सहाय्य या घटकाखालील बाह्य यंत्रणेच्या  पदांना नियुक्तीच्या दिनांकापासून पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी मंजूरी देण्यात आली.


            तांत्रिक मनुष्यबळ सहाय्यासाठी पुढील ५ वर्षाकरिता येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती  खर्चाकरिता एकूण ५८ कोटी ८६ लाख ७ हजार या खर्चास मंजूरी देण्यात आली.


            लातूर, उस्मानाबाद, जालना येथील कौटुंबिक न्यायालये कार्यान्वित झालेली आहेत


    दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


               घरी राहा, सुरक्षित राहा 
               प्रशासनाला सहकार्य करा...