कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर


आज बरे झाले ७४७८ रुग्ण


            - आरोग्यमंत्री राजेश टोपे



मुंबई प्रतिनिधी : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण ५९.८४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील ७४७८ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३९ हजार ७५५ झाली आहे.आज ९२११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४६  हजार १२९  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


          आज निदान झालेले ९२११ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९८ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११०९ (६०), ठाणे- २३१ (१३), ठाणे मनपा-२८८ (१३),नवी मुंबई मनपा-३८० (६), कल्याण डोंबिवली मनपा-३०९ (१५),उल्हासनगर मनपा-८१ (७), भिवंडी निजामपूर मनपा-२४ (७), मीरा भाईंदर मनपा-१११ (३), पालघर-७९ (१), वसई-विरार मनपा-२१५ (७), रायगड-३४७ (५), पनवेल मनपा-१५० (२), नाशिक-९९ (३), नाशिक मनपा-४१० (२), मालेगाव मनपा-१८, अहमदनगर-१३३, अहमदनगर मनपा-१७४, धुळे-९० (२), धुळे मनपा-५६ (३), जळगाव-१५४ (१०), जळगाव मनपा-३७ (२), नंदूरबार-११ (३), पुणे- २९४ (१०), पुणे मनपा-१४५८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-८३९ (१०), सोलापूर-२०४ (११), सोलापूर मनपा-४८ (४), सातारा-१४१ (७), कोल्हापूर-११२ (३), कोल्हापूर मनपा-४४ (१), सांगली-२९, सांगली मिरज कुपवाड मनपा-११०, सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-५४, औरंगाबाद-१२९ (५), औरंगाबाद मनपा-४०९ (१२), जालना-१७ (४), हिंगोली-१० (१), परभणी-९, परभणी मनपा-२३ (२), लातूर-५२ (२), लातूर मनपा-१७, उस्मानाबाद-५१ (१), बीड-३८ (२), नांदेड-८९ (१), नांदेड मनपा-४ (२), अकोला-८ (३), अकोला मनपा-३ (१), अमरावती-२४, अमरावती मनपा-८० (३), यवतमाळ-२३, बुलढाणा-४० (२), वाशिम-२१ (१), नागपूर-९३ , नागपूर मनपा-१५३ (५), वर्धा-१३, भंडारा-६, गोंदिया-६, चंद्रपूर-१४, चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-६, इतर राज्य ११ (१). आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख १६ हजार २३४ नमुन्यांपैकी ४ लाख ६५१ नमुने पॉझिटिव्ह (१९.८७ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ७७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६१ टक्के एवढा आहे.


    दिगंबर वाघ                


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏