ईद-उल-अजहा तथा बकरी ईद निमित्त शुभेच्छा

ईद-उल-अजहा' तथा 'बकरी ईद'निमित्त


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा मुंबई प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना 'ईद-उल-अजहा' तथा 'बकरी ईद'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावरील कोरोना संकट लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी 'बकरी ईद' साधेपणाने साजरी करावी, सोशल डिस्टन्सिंग राखावं, सामुहिक नमाज पठण टाळून घरीच नमाज अदा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


          मुस्लिम बांधवांनी रमजान काळात केलेलं सहकार्य यावेळीही करावं. कोरोनाचं संकट संपल्यानंतर आपण आपले सर्व सण पुर्वीप्रमाणे उत्साहात, आनंदात, सर्वांना सोबत घेऊन साजरे करु शकू, असा विश्वास देखील उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


   दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏