दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनारमुंबई प्रतिनिधी : दिव्यांग व्यक्तींमध्ये अंत्योदय योजनेची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत मोफत वेबीनार आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार दि. 21 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2.00 वाजता  अंत्योदय योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती  देण्याकरिता कैलास पगारे, भा.प्र.से. यांना आमंत्रित करण्यात आले आहे.


       या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/9djIARbskuM या लिंकचा वापर करावा. तसेच यापुर्वी दिव्यांग कल्याण आयूक्तालय पुणे यांच्यामार्फत आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या वेबीनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या यु टयूब चॅनल ला भेट द्यावी.


  दिगबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..