दिलखुलास कार्यक्रमात महात्मा गांधीजी यांची नेतृत्व शैली याविषयावर मुलाखत

दिलखुलास कार्यक्रमात 'महात्मा गांधीजी यांची नेतृत्व शैली 'याविषयावर मुलाखतमुंबई प्रतिनिधी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'महात्मा गांधीजी यांची नेतृत्व शैली '' या विषयावर मुंबई विद्यापीठाचे  डॉ.विवेक बेल्हेकर  यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि.५ ऑक्टोबर व मंगळवार दि.६ ऑक्टोबर व बुधवार दि.७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या  ॲपवर  ही याच वेळेत ऐकता येईल. निवेदक राजेंद्र हूंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


      या मुलाखतीत महात्मा गांधीजी यांची नेतृत्वशैली व त्यांच्या विचारांचा समाजमनावरील प्रभाव, तरुण पिढीच्या मनातील गांधीजी, गांधीजी यांच्या विचारांची तत्वे व आजचा कालखंड, अहिंसेचे महत्व, मानसशास्त्रीय दृष्ट्या आजही समाजातील प्रत्येक घटकावर असलेला महात्मा गांधीजी यांच्या विचारांचा प्रभाव याविषयी सविस्तर माहिती डॉक्टर विवेक बेल्हेकर  यांनी'दिलखुलास' कार्यक्रमात दिली आहे.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..