अभय योजनेअंतर्गत ६० कोटी रुपयांचा करदात्यांनी केला भरणा
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कोविड-19 साथीच्या बिकट परिस्थितीत महापालिकेच्या थकित करदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे याकरिता महापालिकेने 15 ऑक्टोबर 2020 ते 31 डिसेंबर,2020 या कालावधीमध्ये "अभय योजना-2020" लागू केली आणि या अभय योजनेस महापालिकेच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.अभय योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2020 ते 4 डिसेंबर 2020* या कालावधीत रु. 60 कोटींचा भरणा करदात्या नागरिकांनी महापालिकेच्या तिजोरीत केला आहे,गतवर्षी याच कालावधीत(15 ऑक्टो. ते 4 डिसें.) *रु.*27कोटींचा*भरणा नागरीकांनी महापालिकेत केला होता.
या योजनेमध्ये संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराची संपूर्ण रक्कम तसेच व्याजाची 25 टक्के रक्कम एक रक्कमी भरल्यास, 75 टक्के व्याज माफ केले जाणार आहे.
तरी सर्व थकीत करदात्यांनी कराची रक्कम दि. 31 डिसेंबर, 2020 वा त्यापूर्वी जमा करुन अभय योजनेचा लाभ घ्यावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
🙏सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा🙏