कल्याण पुर्व भागात सापडले नवजात अर्भक

योगिता गायकवाड समाजसेविका यांच्या प्रयत्नाने नवजात अर्भकाला मिळाले नाव व जिवदान

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी केले सर्वोत्तोपरी प्रयत्न

कल्याण प्रतिनिधी : कल्याण पुर्वेकडील भागात तिसगाव रोड परिसरातील यशवंत हाईट्स इमारतीच्या पाठीमागे नाल्याचे काम करीत असताना कामगाराला एका ओढणीत बांधलेला अवस्थेत अर्भक दिसले.त्याने लागलीच मनसेचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांना फोनवर अर्भक सदृश वस्तू असल्याची खबर दिली.समाजसेविका योगिता गायकवाड,मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे,महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम व जिल्हा सचिव वासंती जाधव यांनी बाळाला घेऊन लागलीच रुक्मिणीबाई रुग्णालयात धाव घेतली.नवीन अर्भक मिळाल्याची खबर स्थानिक कोळशेवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. स्वताची पाठ थोपटणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे असलेले रुक्मिणीबाई रुग्णालयात बालरोग तज्ञ नसावेत यासारखे कल्याणकरांचे दुर्दैव ते कोणते असा प्रश्न उपस्थित होत आहे.जीवाचा आटापिटा करून नवीन अर्भकाचे प्राण वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱयांना रुक्मिणीबाई रुग्णालयाचा बेशिस्त कारभार अनुभवास मिळाला असल्याचे सांगितले.त्यानंतर त्या अर्भकाला रामबाग परिसरातील खासगी रुग्णालय कोराने मध्ये दाखल करण्याचे ठरले,मात्र तिथे सुद्धा या पदाधिकाऱयांची निराशाच झाली

        शेवटी सिंडिकेट येथील मेट्रो रुग्णालयात अर्भकाला दाखल करण्यात आले असून बाळाची आक्सिजन क्षमता फार कमी झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.अजून थोडा उशीर झाला असता तर विपरीत घडले असते असेही डॉक्टर बोलले.समाजसेविका योगिता गायकवाड मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे,जिल्हाध्यक्षा स्वाती कदम व जिल्हा सचिव वासंती जाधव  यांनी एका नवीन अर्भकाला जीवदान दिल्याने मनसेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अर्भकाचे नाव राज ठेवण्यात आले असून निर्दयी माता-पित्याचा शोध पोलिसांनी घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.
           दिगंबर वाघ  

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏