आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे वाचन प्रेरणा दिवस साजरा.
ठाणे प्रतिनिधी : एपीजे अब्दुल कलाम सर यांनी सांगितले आहे की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि परिणाम साध्य करण्यासाठी तुम्हाला तीन शक्तिशाली शक्ती समजल्या पाहिजेत आणि त्यावर प्रभुत्व मिळवले पाहिजे.इच्छा विश्वास आणि अपेक्षा.त्यांनी त्यांच्या आयुष्यात लहानपणापासून खूप कष्ट केले मेहनत केली हे सगळ्यांनाच माहित आहे. कलाम सर यांचे नाव घेतले की लहान मुलांपासुन तरुण वर्गाच्या डोळ्यासमोर येते ते मिसाईल सगळे त्यांना मिसाईल मॅन म्हणूनच ओळखतात.
१५ ऑक्टोबर हा दिवस म्हणजे कलाम सरांचा जन्मदिवस आणि हा दिवस आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतो.आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला त्या प्रसंगी सूत्रसंचालक निवेदक एमसीसी महाविद्यालयाचे ग्रंथपाल अमेय रानडे यांना बोलावण्यात आले.त्यांनी तरुणांना वाचनाचे महत्व पटवून दिले त्याचबरोबर वाचन संस्कृतीचे विविध दाखले देत व कलाम सरांच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगून पटवून दिले.त्यांच्या क्षेत्रामध्ये वाचनाचा किती उपयोग होतो व आपल्याला मिळवायचे असल्यास किंवा उत्तम करिअर घडवायचे असल्यास वाचन खूप महत्त्वाचे आहे हे देखील सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा. श्वेता कदम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एन एस एस प्रमुख प्रा.संजना भाबल यांचे खुप सहकार्य लाभले.प्राचार्या डॉ.हर्षला लिखिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.प्रा.सचिन आंबेगावकर सिद्धेश बागवे आशिष मुळे गौतम थोरवे सागर मोरे आकाश ढवळ एनएसएस स्वयंसेवक व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस स्वयंसेविका दिव्या वाळंज हिने केले तर आभार प्रदर्शन श्रुती मोरे हिने केले.