ससून रुग्णालयाच्या गणेश बडदरे यांनी ३०,००० रू महसूल बुडवला

आपल्या आपल्या कार्यालयातील भ्रष्टाचार लपवण्यासाठी नागरिकांना माहिती न देणे इतर यंत्रणा आपल्या मनमानी प्रमाणे राबवणे ...

 ३०,०००/ हुन अधिक शासनाचा महसूल बुडवला गणेश बडदरे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत- दिगंबर वाघ सरचिटणीस कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई.

पुणे प्रतिनिधी : याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की कोरोना(कोविड-१९) या काळामध्ये सर्वसामान्य              नागरिक हे आप आपल्या घरामध्ये बसले होते कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून यासाठी आरोग्य यंत्रणा   अहोरात्र काम करीत होती परंतु काही अधिकारी गणेश बडदरे सारखे भ्रष्टाचार लपवण्यामध्ये व्यस्त होते.   याबाबत सप्तरंगचे कार्यकारी संपादक तथा सरचिटणीस कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई यांनी २९  जानेवारी
२०२० रोजी माहिती अधिकारात माहितीची मागणी केली ज्यामध्ये संपूर्ण माहिती ही छायांकित व साक्षांकित स्वरूपात पाहिजे असे होते या अर्जाला काही ही उत्तर दिले नाहीत त्यानंतर अर्जदार यांनी १२ मार्च २०२० रोजी    प्रथम अपील दाखल केले त्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी अपील घेतले त्यांना त्यांचा अधिकार नव्हता तरी डॉ.राजेश   कार्यकर्ते यांनी सुनावणी ८ सप्टेंबर २०२० रोजी घेतली. सुनावणी कलम-१९ अंतर्गत घ्यायचे असते यांनी कलम-२ नुसार घेतली हे सर्व यांनी गणेश बडदरे यांच्या सांगण्यावरून केले असे त्यांनी सांगितले.

        यानंतर २८ सप्टेंबर २०२० रोजी गणेश बडदरे यांनी शुल्क भरण्यास सांगितले परंतु अर्जदार यांनी माहिती अधिकार अधिनियम-२००५च्या कलम ७(१) नुसार शुल्क बाबत किंवा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक क्र.संकीर्ण२०१७/प्र.क्र.(२०८/१७)सहा दि.१७/११/२०१७ च्या परिच्छेद-२ नुसार पत्रव्यवहार न केल्यास संपूर्ण माहिती ही जन माहिती अधिकारी यांनी कलम ७(३) नुसार निःशुल्क देणे बंधनकारक आहेत. मुख्य प्रशासकीय अधिकारी ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील गणेश बडदरे यांनी जवळपास रू ३०,००० /- ऐवढा शासकीय महसूल बुडवला आहेत यानंतर यांनी संपूर्ण माहिती संगणकावर स्कॅन करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांना कामासाठी लावले ज्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे ती माहिती यांनी जाणीवपूर्वक दिली नाही यांना येथील अधिष्ठता मुरलीधर तांबे हे पाठीशी घालत आहेत .वरील सर्व शासनाचा बुडवलेला महसूल यांच्या वेतनातून वसूल करावा अशी मागणी कोकण विभाग पत्रकार संघ यांनी केली आहेत.अन्याथा आदोलन करावे लागेल.

         कोरोना(कोविड-१९) या काळामध्ये येथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहेत यामुळे येथे माहिती देण्याऐवजी चालढकलपणा केला जात आहेत यासाठी बडदरे यांना काम सोपवण्यात आले आहेत यांना या कायद्याची कोणतीही माहिती नाहीत यांना फक्त आणि फक्त माहिती न देणे व इतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे एवढेच काम माहिती आहेत या रुग्णालयात माहिती अधिकार कायद्याची माहिती असलेले माहितीगार अनेक कर्मचारी आहेत परंतु यांना यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले कारण खरी माहिती बाहेर गेली तर यांना घरी जावे लागेल म्हणून त्यांना ते मूर्ख समजतात आतातरी यामध्ये येथील पालकमंत्री अजित पवार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमून याची सखोल व संपूर्ण चौकशी करावी चौकशी निःपक्षपाती होण्यासाठी गणेश बडदरे आणि अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांना तात्काळ निलंबित करायला हवे आहेत.

         मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आला आहेत यांनी माझा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत गणेश बदरे व अधिष्ठता मुरलीधर तांबे यांनी गैरव्यवहार केलेला नसेल तर माहिती ? देण्यात आली नाही मी शुल्क भरण्यासाठी तयार होतो का नियमानुसार पत्रव्यवहार केला नाही माझा मोबाईल नंबर इतरांना ? दिला असे खूप मोठ्या प्रमाणावर आरोप आहेत एका संपादकाला जर हे माहिती देणार नसेल तर सर्वसामान्य नागरिकांना काय माहिती देणार माहिती देणे तर दूर पण यांनी माझी सुपारी देण्याचे पाप केले आहेत.- दिगंबर वाघ सरचिटणीस

      माहितीची मागणी केली म्हणून आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देणार आहेत मी दिलेली माहिती अंतिम आहेत यामध्ये कोणीही फेरफार करणार नाहीत "तू आयोगात जा मी आयोग मॅनेज करेल पण तुला माहिती देणार नाही" तुझ्याकडून काय होईल ते कर परत येऊ नको आलास तर बघ..  - गणेश बडदरे मुख्य प्रशासकीय अधिकारी ससून रुग्णालय पुणे.

       मी यावर काहीही बोलणार नाही. आपल्याला या व्यतिरिक्त काहीही देऊ शकत नाही -मुरलीधर तांबे अधिष्ठता ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे.

दिगंबर वाघ             

        कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


        🙏  एक वचन तीन नियम  🙏

    १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा