औरंगाबाद शहरात मोठ्या वाहनांवर ऑनलाईन बेकायदेशीर कारवाई ?

पोलिस प्रशासनाकडून वाहनांना आँनलाईन दंडात्मक कारवाई करित आहेत 

- संजय हाळनोर अध्यक्ष जय संघर्ष वाहन चालक संघटना

औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबाद या ऐतिहासिक शहरातील शाळा, काँलेजेस सहलीसाठी तसेच नागरिक अंतविधी, दहावे, तेरावे किंवा लग्न समारंभासाठी प्रवासी वाहतुक करणाऱ्या बसेस भाडे तत्वावर नेतात.आशा वेळी प्रवासी घेण्यासाठी व परत सोडण्यासाठी त्यांचे शहरातील ठिकाणा पर्यंत जाणे अनिवार्य असते.कारण प्रवासातील प्रवाशां सोबत त्यांचे आवश्यक ते सामान असते. लहान लहान मुले व वयोवृद्ध स्त्री, पुरूष आसतात.परंतु औरंगाबाद शहरातील कर्तव्यावर आसणारे पोलिस कर्मचारी 119,177,184 असे कलमे लाऊन संबंधित बस चालका कडून दंडाची वसुली करतात. सारथी पँकेज बस असोसिएशन औरंगाबाद यांनी वरील विषयावर 06/07/2017 पासुन वेळोवेळी औरंगाबाद पोलीस आयुक्त, औरंगाबाद परिवहन कार्यालय तसेच औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देऊन सतत पाठपुरावा केलेला आसुन देखील सबंधित बस वाहतुक दारांच्या त्रासास कोणतीही फरक पडलेला नाही.

     तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी औरंगाबाद यांना सारथी बस पँकेज असोसिएशन औरंगाबाद यांचे वतीने 22/8/2016 रोजी वरील आश्याचे निवेदन दिले आसता. 26/08/2016 रोजी स्थानीक वृत्तपत्राव्दारे अमितेश कुमार यांनी सामाजिक कार्यासाठी औरंगाबाद शहरात ये जा करणारऱ्या बसेस ना ये जा करण्यास काही हरकत नाही. तसेच या कामी वाहतूक शाखे कडून परवानगीची आवश्यकता आसणार नाहीत. परंतु सदरील वाहनावर लग्न, सहल असे संबंधित बसेसच्या काचेवर स्टिकर आसणे आवश्यक आसेल असे प्रसिद्धि पत्रक काढून जाहिर केले होते.

      साखरपुडा, मयत, किंवा दहावे तेरावे या कार्यक्रमाचे स्टिकर आसत नाहीत.सहल,लग्न यांचे स्टीकर आसतात परंतु ते स्टिकर संबंधित प्रवाशांच्या घरी पोहचल्यावर लावले जातात. आशा प्रसंगाच्या प्रवासाचे कर्तव्यावर आसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कारण सांगितले आसता ते वाहन जाऊ देतात परंतु पाठी मागुन सदरील वाहनांचा फोटो काढून आँनलाईन वरील नमुद केलेल्या कलमा अन्वये दंडाची पावती पाठवतात.पँकेजच्या भाडे तत्वावर चालणाऱ्या बसेसना शहरातून प्रवास करण्याचा परिवहन विभागास अतिरिक्त टैक्सचा वार्षिक भरणा केलेला आसतो. आसे आसुन देखील वाहतुक विभागातील पोलीस कर्मचारी मनमानी कारभार करतात.वाहतुक विभागातील आशा मनमानी कारभारास वेळीच आवर घालण्यात यावा अन्यथा जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी.

     निवेदन देतानी संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर शहराध्यक्ष लक्ष्मण वाघ ऋषिकेश जाधव सचिन शिंदे विठ्ठल मगर राजू पवार वैजनाथ शिंदे यांच्यासह अनेक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


🙏  एक वचन तीन नियम  🙏

) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा