राज्यपालांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

राज्यपालांच्या दौऱ्याची शेतकरी मोर्चाला पूर्वकल्पना दिली होती

 राजभवनाचे स्पष्टीकरण

 मुंबई  : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांचेकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे व दि. २५ जानेवारी रोजी ते गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला  संबोधित करणार असल्याने राज्यपाल त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राजभवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आल्याचे राजभवनकडून स्पष्टीकरण करण्यात आले होते.

    संयुक्त शेतकरी मोर्चाचे  धनंजय शिंदे (9867693588)यांना  २२ जानेवारी रोजी दुरध्वनीद्वारे तसेच निमंत्रक  प्रकाश रेड्डी यांना दि. २४ जानेवारी रोजी लेखी पत्राद्वारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेबद्दल कळविण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाद्वारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. तसेच  प्रकाश रेड्डी यांना या बाबतचे लेखी पत्र दिनांक २४ जानेवारी रोजी प्राप्त झाले  होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे आहे असे राजभवनातून स्पष्ट करण्यात येत आहे.

     राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून  २५ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता  निवेदन स्विकारतील असे देखील धनंजय शिंदे यांना पूर्वीच कळविण्यात आले होते व  तसे स्विकृत असल्याबद्दल त्यांनी संदेशाव्दारे कळविले होते

दिगंबर वाघ             

        कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


       🙏  एक वचन तीन नियम  🙏

    १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा