बजेट देशासाठी पाहिजे निवडणुकांसाठी नको -उद्धव ठाकरे

 केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा फक्त भांडवलदारांसाठीचं

मुंबई  प्रतिनिधी : आज संसदेत २०२१ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पानंतर यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. सत्ताधारी नेते मंडळींकडून या अर्थसंकल्पाचे कौतुक केले जात आहे. तर, विरोधी पक्षांनी यावर टीका करणं सुरू केलं आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील माध्यमांना थोडक्या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

         बजेट देशासाठी पाहिजे निवडणुकांसाठी नको. हा देशाचा अर्थसंकल्प आहे, निवडणुकांचा नाही. थोडासा अवधी घेऊन मी अर्थसंकल्पावर व्यवस्थित बोलणार आहे',असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.दरम्यान, आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पश्चिम बंगाल, केरळ व दक्षिणेकडील राज्यांसाठी या अर्थसंकल्पात मोठ्याप्रमाणावर तरतूद केल्या गेल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

 केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा फक्त भांडवलदारांसाठीचं'-आमदार सुनील प्रभू

       आज संसदेत २०२१ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घोषणा केल्या आहेत. यावर आमदार सुनील प्रभू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना,'केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा फक्त भांडवलदारांसाठीचा अर्थसंकल्प आहे. कॉर्पोरेट आणि कंपन्यांसाठी व ठेकेदारांचे हे बजेट आहे. अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण भारताची  सरकारने निराशा केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प निराशाजनक असून  मोदी सरकारच्या 'भारत बेचो अभियानाची' अधिकृत घोषणाच आहे,असे मत आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केले आहे.

           सोबतच 'हा अर्थसंकल्प निवडक भांडवलदारांचा आर्थिक विकास, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक, विधानसभा निवडणूक केंद्रीत निवडक विकास,  मनुष्यबळाचे खच्चीकरण, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त आणि नष्ट करण्याची पुनरावृत्ती, कमाल आश्वासने किमान कामगिरी अशा स्वरूपाचा आहे. विशेष म्हणजे देश कठीण काळातून जात असतानाही मोदी सरकारला निवडणुकाच दिसत आहेत. आसाम, पश्चिम बंगालसाठी केलेली तरतूद यावरून हेच सिद्ध होते. बिहार निवडणुकीत मोफत लसीचे दिलेले आश्वासनावरून याआधी हे सिद्धही झाले आहे',अशी प्रतिक्रिया आमदार सुनील प्रभू यांनी दिली आहे.

दिगंबर वाघ             

        कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


         🙏  एक वचन तीन नियम  🙏

    १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा