कर दहशतवाद पूर्णपणे संपवणारा अर्थसंकल्प

बाजार समित्या बंद करणार अशी ओरड करणाऱ्यांची तोंडं बंद करणारं बजेट –देवेंद्र फडणवीस

मुंबई  प्रतिनिधी  : आज संसदेत २०२१ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घोषणा केल्या आहेत.यावर आपली प्रतिक्रिया देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर घणाघात केला आहे. नव्या कृषी कायद्यांद्वारे हमीभाव आणि बाजार समित्या बंद करणार असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण करणाऱ्या विरोधकांची तोंडं बंद करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. स्वतः अर्थमंत्र्यांनी किमान आधारभूत किंमतीचे आकडे देत विरोधकांना आरसा दाखवण्याचं काम केल्याचं फडणवीस यांनी सांगितले आहे.

        पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, 'गव्हासाठी २०१३-१४ मध्ये मागच्या सराकरने ३३ हजार कोटी रुपये हमीभाव (एमएसपी) दिला होता. तो यावर्षी ७५ हजार कोटी, तांदुळाचा ६३ हजार कोटी दिला होता तो आता १ लाख ७२ हजार कोटी, डाळींचा होता २३६ कोटी तो आता १० हजार कोटी, कापसाचा दिला होता ९० कोटी तो आता २५ हजार कोटी देण्यात आला आहे. यावरुन हे स्पष्ट होतं की गेल्या सरकारच्या तुलनेत शेतकऱ्याला दुपट्टीपेक्षा जास्त हमीभाव या सरकारनं दिला आहे',असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे.

 कर दहशतवाद पूर्णपणे संपवणारा अर्थसंकल्प – देवेंद्र फडणवीस

          आज संसदेत २०२१ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घोषणा केल्या आहेत. कर एजन्सीजमार्फत केला जाणारा कर दहशतवाद पूर्णपणे संपवण्याचं काम या बजेटनं केलं आहे, असा दावा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासाठी नवी व्यवस्था अस्तित्वात आली असून ती आणखी सक्षम करण्याचे काम सुरु असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं आहे.

          यावेळी यंदाच्या बजेटचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस यांनी, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं बजेट हे महत्वाकांक्षी आणि आत्मविश्वासानं भरलेलं आत्मनिर्भर भारताचं बजेट आहे. अतिशय संक्रमणाच्या परिस्थितीत प्रचंड मोठी आव्हान समोर असताना लॉकडाउनमुळे मोठी तूट निर्माण झालेली असताना त्याचा कुठलाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ न देता अर्थव्यवस्थेला अधिक चालना कशी मिळेल, याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. विशेषतः सहा क्षेत्रांवर या बजेटमध्ये फोकस करण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य, अर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास, मानव संसाधन, नाविन्यता संशोधन आणि विकास आणि मिनिमम गव्हर्नमेंट-मॅक्सिमम गव्हर्नन्स यांचा समावेश आहे', असं मत व्यक्त केले आहे.

दिगंबर वाघ             

       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


          🙏  एक वचन तीन नियम  🙏

    १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा