आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार एक्स-रे- मशीन बंद...

दोन वर्षापासून एक्स-रे मशीन ऑपरेटर विना बंद सुरू न केल्यास शिवसेना उपोषण करणार - चंद्रकांत लाडे

औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबाद येथील कन्नड या ग्रामीण भागातील नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय असतात ग्रामीण रुग्णालय कन्नड येथील एक्स-रे मशीन दोन वर्षापासून ऑपरेटर (कर्मचारी) नसल्यामुळे बंद स्थितीत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की

     ग्रामीण रुग्णालयातील हे पद दोन वर्षापासून रिक्त असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक यांनी सप्तरंग या वृत्तवाहिनी सोबत बोलतानी दिली. यामुळे येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून ही तात्काळ थांबवावी अन्यथा शिवसेना बेमुदत उपोषण करेल असे निवेदन देते वेळी सांगण्यात आले. सध्या कोरोना महामारी ची परिस्थिती असताना आरोग्य विभाग यंत्रणा बंद ? करून ठेवते हे कळत नाही. याबाबत प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन तात्काळ एक्स-रे मशीन सुरू करून नागरिकांना सुविधा द्यावी. निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख चंद्रकांत लाडे सुनिल पवार पप्पू शिंदे चेतन तायडे अमोल शिरसाट यांनी अधीक्षक देगावकर यांना सांगितले.

⚫  उपोषणाची वेळ येणार नाही याची काळजी घेऊ.. उपसंचालक आरोग्य विभाग औरंगाबाद यांना वारंवार रिक्त पदांबाबत रितसर कल्पना दिली होती. आम्ही ऑपरेटर (कर्मचारी) मागणी करीत असून ते आम्हाला ज्या दिवशी देतील त्याच क्षणी एक्स-रे मशीन सुरू होईल.- डॉ.दत्ता देगावकर अधिक्षक ग्रामीण रुग्णालय कन्नड.

⚫ एक्स-रे मशीन तात्काळ सुरू करण्यात यावी आपण दोन वर्षापासून कन्नड शहर व परिसरातील नागरिकांना मूर्ख बनवले आहेत कोरोना काळात नागरिक घरामध्ये बसले त्याचा आपण असा फायदा घेतला ? एक्स-रे मशीन सुरू न झाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल या वेळी होणाऱ्या परिणामास उपसंचालक औरंगाबाद व ग्रामीण रुग्णालय कन्नड हे स्वतः जबाबदार राहील याची आपण नोंद घ्यावी.- चंद्रकांत लांडे उपशहरप्रमुख शिवसेना कन्नड.

दिगंबर वाघ             

      कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


        🙏  एक वचन तीन नियम  🙏

   १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा