शासनाचा 7 कोटींचा महसूल बुडविल्याप्रकरणी
तत्कालीन तहसीलदारांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी
- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई प्रतिनिधी : औरंगाबाद ग्रामीणचे तत्कालीन तहसीलदार यांनी कुळ जमीन विक्री व्यवहारास परवानगी देताना नियमांचे उल्लंघन करून खरेदीदारांकडून जमिनीच्या रेडीरेकनर दरानुसार निम्मी रक्कम वसूल केली नसल्यामुळे शासनाचा तीन कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. या प्रकरणी तत्कालीन तहसीलदारांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येत आहे अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात सदस्य अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रकरणी महिनाभरात दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
🙏 एक वचन तीन नियम 🙏
१) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा