संस्थेच्या पदाधिकारी यांची सहकार वर्ष अखेरची वैधानिक कामे

 

                  भाग १६

 ॲड. विशाल लांजेकर यांच्या लेखणीतून

          दर आठवडयाला, दर सोमवारी...

कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मन:स्थिती बदलायची असते.

सहकार वर्ष हे ३१ मार्च ला संपते. वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून चार महिन्याच्या कालावधीत

संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण करून पुढील दोन महिन्यात सदस्यांची अधिमंडळाची वार्षिक बैठक

बोलावणे कायद्याने बंधनकारक असते. परंतु पुढील महिन्यापासून करावयाची वैधानिक कामे

हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था सोडल्यास इतर संस्थेत आनंदी आनंद असतो.

पदाधीकार्याकडे कारणाची न संपणारी यादी असते. परंतु योग्यप्रकारे वेळीच काम केले तर

भविष्यात आपला मौल्यवान वेळ वाचण्यास नक्कीच मदत होइल.

१) खर्च केलेल्या रकमांची प्रमाणके (व्हाउचर्स) योग्यप्रकारे स्वीकृत केली आहेत याची तपासणी करणे.

२) ३१ मार्च रोजी कॅश बुक आणि हाती काही शिल्लक असल्यास ती रक्कम तपासून पाहणे.

३) सदस्यत्वाचा अर्जासोबत प्रवेश फी आणि हस्तांतरण फी बरोबर घेतली आहे का ते तपासणे.

४) इतिवृत्त सर्व सभांचे योग्य प्रकारे नमूद केले आहेत का ते तपासणे.

५) बँकेचे संस्थेचे पासबुकमध्ये इंटरेस्टची नोद बरोबर झाली आहे हे पाहणे.

६) ३१ मार्च रोजी मुदत ठेव असलेल्या पावत्या संस्थेच्या ताब्यात असल्याची पाहणी करणे.

७) वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना देण्यात यावा. बऱ्याच संस्थेत अहवाल सदस्यांना दिला जात नाही.

८) ३१ मार्च रोजी कसुरदार सदस्याचे खाते आणि मासिक बिल मधील रक्कम बरोबर आहे का ते पाहणे.

९) कसुरदार सदस्यास मुद्दल आणि व्याज याची माहिती द्यावी. व्याज चक्रवाढ (Compound) नसावा.

१०) सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे संस्थेच्या वतीने देऊन सदर पत्रव्यवहाराची

स्वतंत्र फाईल बनवली आहे की नाही हे पाहणे.

या बाबींचे पालन केल्यास बरेचसे वाद कमी करण्यास संस्थेस मदत होईल. पदाधिकारी हे लोकांनी निवडून

देलेले सदस्य असतात. वाद उद्भवल्यास वेळीच कायदेतज्ञ यांचा सल्ला सदस्यांनी तसेच पदाधिकारी यांनी

घेतल्यास, सहकार संस्थेत जास्तीत जास्त असहकार दिसतो असे म्हणावे लागणार नाही.

मागील लेखाबाबत अथवा सशुल्क मार्गदर्शन, तसेच सदर लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रीया

vishal@vlawsolutions.com 

वर नक्की पाठवा.

दिगंबर वाघ             

     कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८