के.डी.एम.सी.ऐतिहासीक १०.७८ कोटींची वसूली..

महापालिकेच्या इतिहासातील मालमत्ता कराची विक्रमी वसूली - आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी तब्बल रु.10.78 कोटींची वसूली !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने दि.31 मार्च रोजी एका ‍दिवसात तब्बल रु. 10.78 कोटींची वसूली करून सन 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण रु. 427.50 कोटी विक्रमी वसूली केली आहे.कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने दि.15 ऑक्टोबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या 3 महिन्याचे कालावधीकरीता 75 % व्याज माफीची अभय योजना लागू केली होती. त्यास करदात्यांनी 

उत्स्फुर्त प्रतिसाद देवून सदर कालावधीत रू.230.85 कोटी वसूलीस हातभार लावला होता.

           सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकीय उद्दीष्ट रू.425 कोटी असताना मालमत्ता कर संकलन विभागाने एकूण रू.427.50 कोटी वसूल केले असून ही महापालिकेच्या इतिहासातील मालमत्ता कराची सर्वात जास्त विक्रमी वसूली आहे, जी गत वर्षापेक्षा तब्बल रू. 134.41 कोटीने जास्त आहे.कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेकरीता महापालिकेचा बहुतांश कर्मचारी वर्ग गुंतलेला असताना महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे कणखर नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कर ‍निर्धारक व संकलक श्री. विनय कुळकर्णी व त्यांचा अधिनस्त कर्मचा-यांनी, उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर अथक परिश्रमा अंती केलेली वसूली ही निश्चितच कौतुकास्पद आहे. याकरीता महापालिकेने गत वर्षाच्या प्रारंभापासूनच विविध उपाय योजना अंमलात आणल्या असून त्यात विहीत वेळेत ‍बिले जनरेट करून पोहच करणे, कराचा भरणा ऑनलाईन करणेकरीता जनजागृती करणे, त्याकरीता डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड/ युपीआय/ बीबीपीएस/गुगल पे/फोन पे/भिम युपीआय/पॉस मशिन /नेट बँकीग इ.द्वारे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच वाणिज्य ‍आस्थापना, ‍निवासी सदनिका व ओपन लँड विकासक यांना जप्ती पुर्वीच्या नोटीसा देणे व वाणिज्य आस्थापना सिल करणे इ. चा अंतर्भाव आहे.

         महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक व त्यांच्या कर्मचारी वर्गाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व शहर अभियंता/जल अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी देयकांच्या वसूली पोटी रु.66.94 कोटीची वसूली केली आहे . ही वसूली देखील महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी वसूली आहे . गतवर्षी ही वसूली रु.61.10 कोटी इतकी होती.कोविड साथीच्या या कठीण परिस्थितीतही महापालिकेच्या करदात्यांनी करांचा भरणा करुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबाबत महापालिका करदात्या नागरिकांची आभारी आहे.

          सन 2021-22 या आर्थिक वर्षातही करदात्यांनी वर्षाच्या प्रारंभापासूनच शक्यतो ऑनलाईनद्वारे कराचा भरणा करून महापालिकेस असेच सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. महापालिकेच्या इतिहासातील मालमत्ता कराची विक्रमी वसूली - आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी तब्बल रु.10.78 कोटींची वसूली ! 

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८