मार्च महिन्यात विना मास्क १३,६४,१०० इतकां दंड वसूल..

माहे मार्चमध्ये मास्क परिधान न केलेल्या 2730 व्यक्तींकडून रु.13,64,100/- इतका दंड वसूल ! 

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत असूनही अजून काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे दिसून येत आहे. माहे मार्चमध्ये घराबाहेर विना मास्क फिरणा-या 2730 व्यक्तींकडून महानगरपालिका कर्मचारी पथकाने पोलिसांच्या मदतीने रु.13,64,100/- इतका दंड वसूल केला.

            सध्‍याचा काळ हा लग्न सराईचा असल्यामुळे, बाहेर विशेषत: गर्दीच्या ठिकाणी अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावा तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८