क्रॉफर्ड मार्केट पुनर्विकास कामाची महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली पाहणी

क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा फुले मंडईतील गाळेधारकांच्या समस्या तसेच पुनर्विकास कामाची  महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली पाहणी

 मुंबई प्रतिनिधी : क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा फुले मंडईच्या गाळेधारकांच्या समस्या तसेच पुनर्विकास कामाची  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिनांक ५ मे २०२१ रोजी पाहणी करून गाळेधारकांशी सविस्तर चर्चा केली.याप्रसंगी सह आयुक्त (सुधार) रमेश पवार तसेच सहाय्यक आयुक्त  (बाजार)   मृदुला अंडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

        प्रारंभी, क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा फुले मंडईच्या पुनर्विकास कामाची महापौरांनी सविस्तर पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर पुनर्विकास कामामुळे बाधित होणाऱ्या गाळेधारकांशी महापौरांनी संवाद साधला.  महापौर किशोरी पेडणेकर गाळेधारकांना म्हणाल्या की,  बृहन्मुंबई महानगरपालिका महात्मा फुले मंडईचा पुनर्विकास करीत असून यामध्ये कुठल्याही गाळेधारकांचे नुकसान होणार नाही. त्यासोबतच प्रत्येक परवानाधारकांना त्यांची किती जागा आहे,  पुनर्विकासाचे काम कधी पूर्ण होणार, तसेच किती जागा मिळेल याची सविस्तर  माहिती असलेले अधिकृत  पत्र प्रत्येक परवानाधारकांना देण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. जेणेकरून गाळेधारकांचा कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता त्यांचे समाधान होईल. तसेच संबंधित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. महापौरांनी यावेळी गाळेधारकांना देण्यात येणाऱ्या संक्रमण शिबिराच्या जागेची सुद्धा पाहणी केली.  संबंधित ठिकाणी योग्य त्या सोयी - सुविधा पुरविण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८