जवानांच्या अभिनंदनासाठी गृहमंत्री गडचिरोलीत

१३ नक्षल्यांचा खात्मा : जवानांच्या अभिनंदनासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गडचिरोलीत

गृहमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांचा हा पहीलाच गडचिरोली दौरा

गडचिरोली प्रतिनिधी : एटापल्ली तालुक्यात झालेल्या चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलेल्या गडचिरोली सी ६० पथकाच्या जवनांचे व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज दुपारी एक वाजताच्या सुमारास गडचिरोलीत दाखल झाले. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रातंर्गत पयडीच्या जंगलामध्ये नक्षलांसोबत झालेल्या मोठ्या चकमकीमध्ये कसनसुर दलमचे १३ नक्षलवादी ठार करण्यात यश मिळविले. जवानांनच्या या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील येत आहे. त्यांचे समवेत राज्याचे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक हे देखील राहण्याची शक्यता आहे. गृहमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांचा हा पहीलाच गडचिरोली दौरा आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८