पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीची पाहणी

कोरोना काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलिसांचा केला गौरव सेवा काळात कोरोना संसर्गाने मृत्यू पावलेल्यांच्या पाल्यांना दिली नियुक्ती पत्रे

पुणे प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करुन केलेल्या कामाची पाहणी केली.  कोरोना काळात सेवेत केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव तसेच या सेवा काळात ज्यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना पोलीस दलात नेमणूक पत्र त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख,  स्वप्ना गोरे, मितेश घट्टे, प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कर्तव्यावर असतांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या अमंलदाराच्या तीन पाल्यांना अनुकंपातत्वावर नियुक्तपत्र देवून पोलीस दलात नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये सामेश संतोष  म्हेत्रे, अभिजीत आनंद गायकवाड, प्रसाद दिलीप वावरे यांचा समावेश आहे.

     उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोरोनाच्या काळात चागंली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला. त्यामध्ये पोलीस निरिक्षक विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, सहा पोलीस निरीक्षक सुहास टिळेकर, पोलीस नाईक, उत्तम गाडे, गौरव कांबळे, शिपाई रेणुका भांगरे यांचा समावेश आहे.पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथील नुतनीकरणच्या वेळी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटदार यांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला.

फोटो ओळ-

       उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करुन कामाची पाहणी केली. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख,  स्वप्ना गोरे, मितेश घट्टे, प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते .

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८