कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
महापौर किशोरी पेडणेकर "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन" ने सन्मानित
• sanjay Chaudhari
मुंबई प्रतिनिधी : महापौरांच्या मेजावरून दि.१९जून २०२१ कोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना " वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन " ने आज दि. १९ जून २०२१ रोजी महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात सन्मानित करण्यात आले. "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन" चे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.एक महिला व युवतींचे नेतृत्व करणाऱ्या महिला महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांचा आम्हाला अभिमान असून सर्वच महिला वर्गांसाठी त्या प्रेरणास्त्रोत असल्याचे फराह सुलतान अहमद यांनी सांगितले. कोरोना काळात त्यांच्या कामाची धडाडी व उत्साह हा आम्हाला प्रेरणा देणारा असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच आम्ही सन्मानित केले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी चित्रपट निर्माता अली अकबर अली अब्बास उपस्थित होते.


