समाजात उल्लेखनीय व यशस्वी काम करणाऱ्या लोकांनी विनम्रता अंगीकारून समाजाचे नेतृत्व करावे
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
कोश्यारी म्हणाले, माणसाच्या स्वभावातील अहंकार हा त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. माणूस जेवढा विनम्र राहील तेवढा यशस्वी होईल. काम करणाऱ्यांपैकी जो आपल्या कामाचा मागोवा घेतो तोच यशस्वी नेता होऊ शकतो. आज समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींना माझ्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या सर्वांनी विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे, विनम्रता हीच तुम्हाला सर्वोच्च उंचीवर घेऊन जाईल. सध्या कोरोनाची साथ चालू आहे. जर आपण कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर तिसऱ्या लाटेस आपणच कारणीभूत ठरु, ते सर्व टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्यापालांनी केले. पुणे टाईम्स मिररने समाजातील चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी समाजापुढे आणल्या पाहिजेत. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा भारत लिडरशीप अॅवार्ड देऊन सन्मान केल्याबद्दल राज्यपालांनी लेक्सिकॉन ग्रुप व अॅवार्ड विजेत्यांचे अभिनंदन केले. लेक्सिकॉन ग्रुप, पुणे टाईम्स मिरर तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंचवीस मान्यवरांना भारत लिडरशीप अवार्ड 2021 देऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.