शिधावाटप दुकानाच्या तक्रारींवर कारवाई होणार ?

मुंबई-ठाणे क्षेत्रातील शिधापत्रिका व वितरणासंबधी तक्रार निवारण प्रणाली

 मुंबई प्रतिनिधी : मुंबई-ठाणे शिधावाटप यंत्रणेतील पात्र लाभार्थ्यांकडून शिधापत्रिका व वितरणासंबधी तक्रारी प्राप्त झाल्या असून  ज्या नागरिकांना शिधापत्रिका व वितरणासंबधी काही तक्रारी असल्यास खालील संकेतस्थळ,हेल्पलाईन क्रमांकावर तक्रारी देण्यात याव्यात असे आवाहन नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी केले आहे.

   मुंबई-ठाणे शिधावाटप यंत्रणेतील 01 एप्रिल, 2021 ते 30 जून,2021 या कालावधीत सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीवर एकुण  277 इतक्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी  235 तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने शासनाने स्वतंत्र संकेतस्थळ www.mahafood.gov.in, तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था तक्रार निवारण प्रणालीच्या हेल्पलाईनसाठी 1800-22-4950/1967 हे टोल फ्री क्रमांक व हेल्पलाईन helpline.mhpds@gov.in ई-मेल सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.  प्रणाली विभागाच्या  www.mahafood.gov.in या संकेतस्थळाशी लिंक करण्यात आलेली आहे. सर्व परप्रांतिय व स्थलांतरीत मजूर पात्र लाभार्थ्यांना वन नेशन-वन रेशन कार्ड या योजनेअंतर्गत पार्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.  याबाबतच्या तक्रारीकरीता हेल्पलाईन क्रमांक:- 14445 उपलब्ध आहे. मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्राकरीता हेल्पलाईन क्रमांक 022 22852814 तसेच ई-मेल क्रमांक dycor.ho-mum@gov.in उपलब्ध आहे.

 मुंबई-ठाणे शिधावाटप यंत्रणेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशीलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या SRC No. टाकून खातरजमा करावी.उपरोक्त वितरणासंबधात तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक 022 22852814 तसेच ई-मेल क्रमांक dycor.ho-mum@gov.in यावर तक्रार नोंदवावी. पात्र लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेबाबत तसेच त्यांना देय असलेल्या अन्नधान्याच्या वितरणाबाबत तक्रार असल्यास उपरोक्त नमूद वेबसाईट व हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी जेणेकरुन सदर तक्रारीच्या अनुषंगाने निराकरण करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८