नाले साफ-सफाईच्या नावाखाली नागरिकांचे १४,२३ ३५ ५७५/रुपये जलमय झाले ?

के.डी.एम.सी. ने कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला असून नाले साफ-सफाई झालेच नाही म्हणून पाणी भरले   संजय हंडोरे अध्यक्ष कोकण विभाग पत्रकार संघ

कल्याण प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नाले साफ-सफाईच्या नावाखाली कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे नालेसफाईसाठी ठेकेदारांना ठेका देण्यात आला असून कोणत्याही ठेकेदाराने नालेसफाई पूर्णपणे केलेली नाही. यासाठी २०२०-२०२१ या दोन वर्षासाठी तब्बल १४ २३ ३५ ५७५ /(चौदा कोटी तेवीस लाख पस्तीस हजार पाच शे पंचायतर) रुपये खर्च केल्याबाबतची माहिती अधिकारात उघड झाली याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक चव्हाण यांनी या माहितीची मागणी केली होती.

         अधिक माहिती अशी की या नाले साफसफाई च्या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी ही आरोग्य निरीक्षक मुख्य आरोग्य निरीक्षक सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी यांची होती या अधिकाऱ्यांनी साफसफाईची संपूर्ण नोंद ही रजिस्टर मध्ये ठेवणे अपेक्षित होते परंतु असे केले नाही त्यामुळे जन माहिती अधिकारी अनंत मादगुंडी, बबन बरफ, एन जी चव्हाण, राजेश गोयल यांनी अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप विनायक चव्हाण यांनी केला आहे. यांनी जर पूर्ण माहिती दिली असती तर नागरिकांना आपला पैसा कसा पाण्यात जातो हे सविस्तर समजले असते म्हणूनच माहिती दिली नाही. महानगरपालिकेने आदेश जा.क्र. कडोंमपा/काअ/जनि /१६ दि. ०५/०५/२०२१ च्या आदेशानुसार साफसफाई चा कालावधी ६ महिन्याच्या आत काम पूर्ण करावे गटारातून काढलेला गाळ कोणत्या डंपर मधून कोठे टाकला व किती टाकला याबाबतची दैनंदिन अहवाल तयार करणे अपेक्षित होते. असा आदेश अनंत मादगुंडी कार्यकारी अभियंता (जनि) यांनी दिला होता परंतु हेच कार्यकारी अभियंता स्वतःहाच जन माहिती अधिकारी असून त्यांना याची कल्पना असतानासुद्धा अपूर्ण माहिती देण्याचे काम त्यांनी केले आहेत.

         वरील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी इमानदारीने काम पूर्ण करून घेतले असते तर महानगरपालिका हद्दीत कोठेही पाणी साचले नसते आणि नागरिकांच्या पैशाचे योग्य नियोजन होऊन सदुपयोग झाला असता आता यावर मनपा आयुक्त कोणती कारवाई करतात याकडे संपूर्ण नागरिकांचे लक्ष आहेत. अशा अधिकाऱ्यांना घरचा रस्ता ? दाखवण्यात येऊ नये असा प्रश्न अनेक नागरिक मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांना विचारत आहेत.

 कंत्राटदाराने आतापर्यंत २० टक्के ही काम पूर्ण केले नाही तरीही के.डी.एम.सी.ने २०२१ च्या पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करिता करोडो रुपयांचे कंत्राट मंजूर केले होते. परंतु फक्त जुलै महिन्याच्या पावसाने कंत्राटदाराच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. के.डी.एम.सी.च्या संबंधीत अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंत्राटदारांनी व अधिकाऱ्यांनी कागदोपत्री नालेसफाई दाखवून येथे राहत असणाऱ्या नागरिकांची दिशाभूल केली आहे. - अब्बास घडियाली जेष्ठ पत्रकार

  याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची यावर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता या विषयावर आम्ही प्रतिक्रीया देणार नाहीत असे सांगण्यात आले.


दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८