मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलसाठी मोठा प्रतिसाद हे शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचे द्योतक
-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
विविध माध्यमांतून सर्व अभ्यासक्रम मोफत शिकविणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील कदाचित पहिली महानगरपालिका असेल, असे सांगून ठाकरे यांनी विद्यार्थी संख्या वाढत असताना महानगरपालिकेने शिक्षणाचा दर्जा राखण्यात सातत्य ठेवावे असे आवाहन केले. यावेळी भाई जगताप यांनी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळू शकते हा विश्वास निर्माण केल्याबद्दल आणि शिक्षणाचे नवे पर्व सुरू केल्याबद्दल महापालिकेचे आभार मानले. मंत्री आदित्य ठाकरे यांनी कामाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.पुनर्बांधणी नंतर उभारलेल्या या पाच मजली शाळेत विद्यार्थ्यांसाठी सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
डायलिसिस सेंटरचे उदघाटन
मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मालाडच्या त्रिवेणी नगर येथे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या स्व. माँ. मीनाताई बाळासाहेब ठाकरे डायलिसीस केंद्राचे आज लोकार्पण केले. याठिकाणी १० डायलिसिस मशीन उपलब्ध असून पुढील काळात आणखी ६ मशीन्स उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.