कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
कवी प्रा.पांडुरंग मुंजाळ यांना राज्यस्तरीय पुरस्कार
वसमत प्रतिनिधी : संत नामदेव प्रशासकिय सेवा पदवी महाविदयालयाचे प्राध्यापक व कवी प्रा.पांडुरंग मुंजाळ यांना नुकताच अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येशील अष्टपैलूसंस्कृती कला अकादमी तर्फे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या सलग काव्यलेखन या तत्वावर प्रा.पांडुरंग मुंजाळ यांनी सर्वोतकृष्ट काव्य लेखन केले. त्याबद्दल त्यांना अष्टपैलूसंस्कृती कला अकादमीचे अध्यक्ष किसन खैरे सर यांनी प्रा. पांडुरंग मुंजाळ यांना पुरस्कार देउन सन्मानित केले. तसेच मुसळे निलेश , प्रा.मुरलीधर पंढरकर , प्रा. आकोसकर , प्रा. राम कदम, प्रा. बालाजी सवंडकर , अँड.वैजवाडे साहेब,वैभव वैद्य, अभिषेक साखरे, भावानीप्रसाद कुरवाडे या सर्वांनी अभिनंदन केले. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.