माजी सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे ‘विधी पंडित’ पदवीने सन्मानित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 108 वा दीक्षांत समारंभ संपन्न

मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज झालेल्या 108 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांना मानवविद्या शाखेतील ‘विधी पंडित’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या समारंभात न्या. शरद बोबडे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव श्रीनिवास शरद बोबडे यांनी मानद पदवीचा स्वीकार केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांचे दीक्षांत भाषण झाले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, प्रकुलगुरू डॉ संजय दुधे व कुलसचिव डॉ राजू हिवसे उपस्थित होते.

     राज्यपालांच्या उपस्थितीत 77 हजार 912 स्नातकांना पदवी व पदवी प्रमाणपत्रे तसेच सुवर्ण व रौप्य पदके प्रदान करण्यात आली. दोन उमेदवारांना मानव विज्ञान पंडित (डी.लिट.) ही पदवी तसेच 867 स्नातकांना आचार्य (पीएच.डी.) पदवी देण्यात आली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८