अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई !

महापालिकेच्या विविध प्रभागात अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई ! 

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण  : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 10/इ प्रभागातील, नांदिवली येथील गणेश नगर मध्ये चालू असलेले (तळ + 1) इमारतीचे अनाधिकृत बांधकाम पिलर, मुळासकट  काढून पूर्णपणे निष्कासित करण्याची कारवाई 10/इ प्रभागक्षेञ अधिकारी भारत पवार यांनी आज केली . सदर कारवाई 1 जेसीबी मशिन,1 कॉम्पप्रेसर व महापालिकेचे कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी यांचे मदतीने करण्यात आले. महापालिकेच्या 1/ अ प्रभागातही प्रभागक्षेञ अधिकारी राजेश सावंत यांनी मोहने येथील यादव नगर मधील विराट क्लासिक या इमारतीच्या समोर चालू असलेले अनाधिकृत बांधकाम, 1 जेसीबी , महापालिका कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्याची धडक कारवाई काल दिवसभरात केली. तसेच महापालिकेच्या 5/ड प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल यांनी काटेमानिवली येथील आरक्षित भुखंडावर अनाधिकृतरित्या सुरू असलेले मोबाईल टॉवरचे  बांधकाम,1 जेसीबी, महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी यांच्या सहाय्याने निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८