राष्ट्रध्वजाच्या योग्य वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई प्रतिनिधी  : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत 1 जानेवारी 2015 रोजीच्या आदेशानुसार प्लॅस्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात असे सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम,महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले मैदानात/रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात आणि जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय  संस्था तसेच इतर संघटनाना सुपुर्द करण्यात आले आहेत, असे मुंबई उपनगर उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमिताने आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे प्रश्न मंजुषा स्पर्धा

   भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्न अमृत महोत्सवानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागाने मंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाच्या बाबीविषयी समाजात औत्स्युक्य निर्माण व्हावे, ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळावा आणि समाजमनात त्याचे स्थान कायम रहावे, या उद्देशाने ज्ञान, प्रबोधनासाठी ही स्पर्धा 16 ऑगस्टपासून आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आकाशवाणीच्या बातमीपत्रातून दर सोमवारी एक प्रश्न विचारला जाईल. स्पर्धकांनी या प्रश्नाचे उत्तर आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागाकडे ई-मेलद्वारा पाठवायचे आहे. quiz75news@gmail.com या ई-मेलवर स्पर्धकांनी उत्तर पाठवावे सर्वप्रथम योग्य उत्तर देणाऱ्या यशस्वी स्पर्धकाचे नाव शुक्रवारच्या बातमीपत्रातून प्रसारित करण्यात येतील. आकाशवाणीच्या सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मदरही फोटोसह हे प्रकाशित करण्यात येईल. तसेच प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याच आवाहन आकाशवाणी मुंबईच्या वृत्तविभागप्रमुख सरस्वती कुवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८