फ व ग प्रभागात अतिधोकादायक इमारतींवर कारवाई

महापालिकेच्या फ व ग प्रभागात अतिधोकादायक इमारतींवर निष्कासनाची धडक कारवाई सुरु ! 

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण  : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत यांचे मार्गदर्शनाखाली ग प्रभागक्षेत्र अधिकारी संदिप रोकडे यांनी डोंबिवली पूर्व, दत्त नगर येथील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या हेंरंब बिल्डींग या (G+3) 50वर्षे जुन्या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची कारवाई आज सुरु केली. सदर इमारतीस 04 वर्षापासून नोटीस देण्यात येत होती. इमारत रहिवासमुक्त करुन तेथील रहिवाश्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.सदर कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी/कामगार, महापालिकेचे पोलिस कर्मचारी व 1 जेसीबी आणि 2 ब्रेकरच्या यांच्या मदतीने सुरू करण्यात आली. ही कारवाई पुढील 5 दिवस सुरू राहणार आहे.

     त्याचप्रमाणे फ प्रभागक्षेत्रातही फ प्रभागक्षेञ अधिकारी भरत पाटील यांनी डोंबिवली पूर्व, अंबिका नगर, गोग्रासवाडी येथील गोविंद निवास (G+4 ) या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची कारवाई सूरू केली. सदर इमारत ही 32 वर्षे जूनी असून या इमारतीस माहे जानेवारी 2021 पासून नोटीस बजावण्यात येत होती. या इमारतीमधील रहिवाश्यांना रहिवासमुक्त करुन इमारतींमधील सदनिकांचे मोजमाप करुन त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सदर इमारत ही दाट वस्तीमध्ये असल्यामुळे इमारतीच्या निष्कासनाचे काम अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी/कामगार तसेच 4 कॉम्प्रेसर मशिन व महापालिका पोलिस कर्मचारी यांचे मदतीने सुरु करण्यात आले आहे. सदर कारवाई पुढील 8 ते 10 दिवस सुरु राहणार आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८