प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८