२८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा

स्वामी समर्थ बहुउद्देशिय संस्था २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणे बाबत सरकारी कार्यालयाला निवेदन..

मुंबई प्रतिनिधी मिलिंद महाडीक : माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात  १२/१०/ २००५ पासून लागू करण्यात आला आहे. शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलामुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे. महाराष्ट्रात माहिती अधिकार २००५ या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धी करिता व प्रभावी अंमलबजावणी करिता शासन स्तरावर सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे. दि. २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी माहिती अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जारीत नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा मानस आहे. असे जनहितार्थ शासन निर्णयात नमूद आहे. यास्तव प्रतिवधी २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा असा निर्णय, जनहितार्थ शासनाने घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्या विभागात माहिती अधिकार या विषयावर प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध, वकृत्व इ. सारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र, व्याख्यानमाला आयोजित कराव्यात. माहिती अधिकार कायदा हा भ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध आहे. शासनस्तरावर या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास जनतेमधील असंतोष कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे .असे आमचे मत आहे. तसेच माहिती अधिकार कायदा हा जनहितार्थ उपयोग केला पाहिजे. कायद्याचा गैरवापर करणाऱ्या वाईट प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी प्रामाणिक सज्जन शक्तींनी कायद्याचाच संघटितरीत्या वापर केला पाहिजे. संविधानातील तरतुदी नुसार आपणास जनहितार्थ विनंती करण्यात येत आहे....

   अंमलबजावणीच्या अपेक्षेत धन्यवाद....जनहितार्थ प्रतिसादाच्या अपेक्षेत !! कळावे...

अशा पद्भतीचे निवेदन "स्वामी समर्थ बहुउद्देशिय संस्था" मुंबई अध्यक्षा  सविता वाघमारे यांच्या माध्यमातून महानगर पालिका सहाय्यक अभियंता धीरज बांगर साहेब, 'के' पश्चिम विभाग, अंधेरी, मुंबई यांना तसेच डी. एन. नगर. पोलिस स्टेशन, सहाय्यक पोलिस आयुक्त जोत्स्ना रासम यांना, त्याचप्रमाणे शिधावाटप कार्यालय क्रं. २५/ड अंधेरी, पश्चिम विलास शंखे साहेब यांना वरील पद्धतीचे निवेदन देण्यात आले. सर्व सामान्य जनता व शासन कार्यालय अधिकारी यांच्या माहिती अधिकारांची माहिती जनते समोर मांडून सर्वांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची अमंलबजावणी करणे हा उद्देश आहे.

        माहिती अधिकाराचे नोडल ऑफिसर म्हणून जिल्ह्यासाठी संदर्भ क्र.३ ने सन्माननीय जिल्हाधिकारी यांना नियुक्ती करण्यात आले आहे. संदर्भ क्र. १ व २, नुसार २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणेबाबत शासनाने निर्णय घेतले होते व आहेत. तरी विनंती की, २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन म्हणून आपल्या विभागात माहिती अधिकार बाबत जनजागृती या संदर्भाने कार्यक्रम घेणे गरजेचे व अपेक्षित आहे. संदर्भ क्र. १. नुसार तयार होणारा अहवाल. आम्ही जनहितार्थ माहिती अधिकारात मागवणार आहोत. तरी जनहितार्थ आपण सतर्क दक्ष जनसेवक अर्थात अधिकारी म्हणून याची अंमलबजावणी कराल.याकरिता वरील तत्सम यंञणेला "स्वामी समर्थ बहुउद्देशिय संस्था" मुंबई अध्यक्षा सविता वाघमारे यांनी २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यासाठी निवेदन दिले.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८