अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत 'अन्न सुरक्षा सप्ताह' राबवा -अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, औषधे खरेदी करताना, हाताळताना व प्रत्यक्ष वापरताना घ्यावयाच्या काळजीबाबत सर्वसाधारण माहिती ग्राहकांना उपलब्ध झाली पाहिजे. सध्या सणांचा कालावधी आहे अशावेळी अन्न भेसळीच्या घटना घडू शकतात. अन्नभेसळ कशी ओळखावी याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. अन्न व सुरक्षा मानके प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या योजना यांची रेल्वे स्टेशन नजिकचा परिसर, खाऊ गल्ली, भाजीपाला व फळबाजार आदी विविध ठिकाणी जनजागृती होणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर भर देवून प्रचार व प्रसिध्दीचे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया व सर्व माध्यमांव्दारे प्रसिध्दी करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केल्या. यावेळी अन्न व औषध प्रशासन, अन्न सुरक्षा व मानके कायदा व विभागाची माहिती, उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.