जिल्हापरिषद ठाणे अंतर्गत गुरवली गावात MMRDA च्या रस्त्याचे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

कल्याण प्रतिनिधी  : केंद्र शासनाने राज्य शासन यांनी ग्रामीण भागात रस्ते बनविण्यासाठी अनेक योजना चालू केल्या असून, अनेक गावांना त्याचा लाभ सुद्धा झालेला आहे. पण कल्याण तालुक्यातील गुरवली गाव यासाठी अपवाद ठरलेला आहे.

    पंचायत समिती कल्याण अंतर्गत गुरवली गावात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता मंजूर होऊन, MMRDA कडून होत असलेल्या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा व मनमानी कारभार केला असून, या रस्त्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी देखील उपविभागीय अभियंता के. के. कुंभारे यांच्याकडे गुरवली गावातील ग्रामस्थांनी लेखी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या निकृष्ट कामाचे पुरावे देखील ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता के. के. कुंभारे यांना दिले/दाखविले आहेत. मात्र तरीदेखील ठेकेदारावर कोणतीच कारवाई होत नसल्याने, गुरवली गावातील ग्रामस्थ हे उपोषणाच्या तयारीत आहेत.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला गुरवली गावातील सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविण्यात येत असून, लॉक डाऊन च्या काळात देखील हे काम मोठ्या प्रमाणावर चालू होते परंतु, या काळात तयार करण्यात आलेला रस्ता हा निकृष्ट दर्जाचा असलेल्या तोंडी तक्रारी वारंवार अभियंता यांना केलेल्या आहेत विशेष म्हणजे ठिकाणी रस्त्याला तडे जायला सुरुवात झालेली आहे. गुरवली गावात काही ठिकाणी ठेकेदाराने चक्क जुन्या रस्त्यावरच रेडी मिक्स सिमेंट टाकून रस्ता बनवला असल्याचे पुरावे देखील ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता यांना दाखविले आहेत.

    रस्ता बनविताना शासकीय नियमांचे उल्लंघन ठेकेदाराने केले असून या संदर्भात आपण वेळोवेळी शासकीय व जबाबदार अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले असून देखील आमच्या तक्रारीकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याने, तात्काळ या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत व ठेकेदारावर कारवाई व्हावी, तसेच कामाची दुरुस्ती व्हावी. अन्यथा जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंचायत समिती कल्याण येथे लवकरच आमरण उपोषण केले जाईल, असे गुरवली गावातील दर्शन दळवी, प्रशांत देशमुख, कमल भवारे, जगदीश देशमुख नरेश दलवी, सरिता देशमुख, भीमा भवारे, अरुण देशमुख, ऋतिक वाघे, चिंधाराम देशमुख, तुषार दळवी, कुसुम देशमुख, कृष्णा दलवी, सिद्धेश देशमुख, संजय दलवी, वर्षा देशमुख, सचिन दळवी, किरण देशमुख, राकेश राणे, निलेश देशमुख, गणेश दलवी, रोहित देशमुख, योगेश देशमुख, प्रदीप देशमुख ह्या ग्रामस्थांनी माहिती दिली आहे.सदर प्रकरणावर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कल्याण  अभियंता  के. के. कुंभारे साहेब कोणती कारवाई करतात याकडे पूर्ण नागरिकाचे लक्ष लागले आहे पंचायत समितीचे उपअभियंता कुंभारे साहेब यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनि संपर्क साधला असता तो संपर्क होऊ शकला नाही तसेच त्या कामाचे इंजिनिअर विशे यांनी उडवडवीची उत्तरे दिली.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८