त्याचप्रमाणे 10/ई प्रभागातही सहा. आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व, नांदिवली मधलापाडा येथील तळ +3 मजली RCC इमारतीचे चालू असलेले अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई आज सुरू केली. सदर बांधकामधारक यांचे बांधकाम यापूर्वी अनधिकृत घोषित करण्यात आले आहे. सदर कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी व 1पोकलेन4 कॉम्प्रेसर1 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.
महापालिकेच्या 3/क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधिर मोकल यांनी कल्याण पश्चिम येथील वल्लीपीर ते पत्रीपूल आणि पत्रिपुल ते दुर्गाडी बायपास रोडवर अनधिकृतरित्या उभ्या असलेल्या 6 टप-या, 5 शेडवर निष्कासनाची धडक कारवाई आज केली. त्याचप्रमाणे 3 हातगाडया देखील जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली.